By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:37 IST
1 / 11आजपासून 18 वर्षांपूर्वी आलेल्या ‘मेरे यार की यादी है’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ट्युलिपजोशी तुम्हाला आठवत असेलच. आज ट्युलिपचा वाढदिवस.2 / 11ट्युलिपचा पहिलाच सिनेमा हिट झाला होता. पहिलाच सिनेमा यशराजचा आणि तो सुद्धा हिट, यामुळे ट्युलिप चर्चेत आली होती/ मात्र यानंतर प्रेक्षकांनी तिला नाकारले़ ही ट्युलिप आज कुठे आहे, कशी आहे? याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल.3 / 11‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटात काम करण्याची संधी ट्युलिपला योगायोगाने मिळाली होती.4 / 11या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा त्याच्या मित्राच्या लग्नात गेले होते. तिथे त्याने ट्युलिपला पाहिले होते. याठिकाणी ट्युलिप आदित्यच्या नजरेत भरली होती आणि त्याने तिथेच तिला ‘मेरे यार की शादी है’ ऑफर केला होता.5 / 11ट्युलिपसाठी हा सुखद धक्का होता. यशराज बॅनरचा सिनेमा मिळाल्याने तिचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. मात्र ट्युलिपला हिंदी तितकं नीट येत नव्हते. त्यानंतर तिने हिंदी धडे गिरविले आणि चित्रपटात काम केले. 6 / 112004मध्ये ट्युलिपला शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’मध्ये संधी मिळाली. पण हा सिनेमा इतका दणकून आपटला. ट्युलिप जवळपास 20 सिनेमात दिसली. पण आपली ओळख निर्माझ करू शकली नाही. यानंतर ट्युलिप बॉलिवूडमधून गायब झाली.7 / 11बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर ट्युलिपने कॅप्टन विनोद नायर यांच्याशी लग्नगाठ बांधली.8 / 11 विनोद नायर हे ‘प्राइड ऑफ लॉयन्स’चे या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक असून यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहेत.9 / 11विनोद 1989 पासून 1995 पर्यंत भारतीय लष्करात होते.10 / 11 लग्नाआधी ट्युलिप व विनोद दोघे जवळपास 4 वर्षे लिव इन रिलेशीपमध्ये राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले.11 / 11लग्नानंतर ट्युलिन नवरा विनोद नायरसोबत त्यांचा कोटीचा बिझनेस सांभाळते आहे. ती कंपनीची डायरेक्टर आहे.