1 / 9प्रियंका कंडवाल ही टिकटॉकवरील ‘मधुबाला’ इंटरनेट सेंसेशन बनली होती. हुबेहुब मधुबालासारखी दिसणारी आणि तिच्यासारखे हावभाव असलेल्या या प्रियंकाच्या टिकटॉक व्हिडीओने अनेकांना वेड लावले होते.2 / 9श्रीदेवीची ही ‘डुप्लिकेट’ बघा. हिचे नाव राखी. श्रीदेवी आज या जगात नाहीत. त्यांच्या निधनानंतर या राखीचे अनेक टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाले होते. श्रीदेवींच्या गाण्यांवर नाचतानाचे अनेक टिकटॉक व्हिडीओ बनवून ती लोकप्रिय झाली होती.3 / 9ही म्हणजे ऐश्वर्या रायची डुप्लिकेट. तिचे नाव अम्मुज अमृता. टिकटॉक व्हिडीओमध्ये अम्मुज ऐश्वर्याचे डायलॉग्सवर लिप सिंक करायची. असे अनेक व्हिडीओ तिने शेअर केले होते.4 / 9किंजल मोरे हिला टिकटॉकर्स दीपिका पादुकोणची डुप्लिकेट म्हणून ओळखत.5 / 9गली बॉय या सिनेमानंतर टिकटॉकवर आलिया भटच्या डुप्लिकेटने धुमाकूळ घातला होता. तिचे नाव सनाया आशु. हुबेहुब आलियासारखी दिसणारी सनायाने गली बॉयमधील मजेशीर डायलॉगवरचे व्हिडीओ बनवून लोकप्रियता मिळवली होती.6 / 9कतरीना कैफची डुप्लिकेट म्हणून अलीना राय टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय होती.7 / 9आता हा टिकटॉकवर एकेकाळी गाजलेला सलमान खानचा डुप्लिकेट बघा. याचे नाव नाजिम खान. त्याचे टिकटॉकवर 28लाख फॉलोअर्स होते.8 / 9टिकटॉकच्या दुनियेत शाहरूख खानचाही डुप्लिकेट होता. त्याचे नाव मकबूल हैदर. टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स असलेला हैदर अनेक व्हिडीओ पोस्ट करून लोकप्रिय झाला होता.9 / 9टिकटॉकवरची ही करिना कपूर. तिचे नाव शनाया सचदेव. करिनासारखी दिसणाºया शनायाचे टिकटॉकवर 9 लाख फॉलोअर्स होते.