1 / 7नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सगळीकडे याचीच चर्चा सुरू झाली आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूरच्या 'राम' अवतारावरून पडदा उचलला गेला असून, लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेची देखील एक पुसटशी झलक पाहायला मिळाली आहे.2 / 7रवी दुबेची पत्नी सरगुन मेहता ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने एक थक्क करणारा खुलासा केला आहे.3 / 7रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सरगुनने सांगितले की, तिच्या आणि रवीमध्ये कामाच्या बाबतीत एक अनोखा नियम आहे. तिने शेअर केले की, ते घरी प्रोफेशनल प्रोजेक्ट्सवर चर्चा करत नाहीत4 / 7'आम्हाला एकमेकांना आपल्या कामाबद्दल सांगण्याची परवानगी नाही. जोपर्यंत रवीच्या कामाची बातमी अधिकृतपणे बाहेर येत नाही, तोपर्यंत तो काय करतोय हे मलाही माहीत नसते,' असे सरगुन म्हणाली.5 / 7सरगुनने सांगितले की, रवी 'रामायण' या मोठ्या चित्रपटाचा भाग असल्याची बातमी तिला स्वतः रवीकडून नाही, तर एका बाहेरील व्यक्तीकडून मिळाली. तिला काहीच माहित नव्हतं.6 / 7जेव्हा कधी सरगुन रवीला विचारायची की तो कुठे जातोय, तेव्हा रवी फक्त 'कामावर जातोय' एवढेच बोलून निघून जायचा. अखेर जेव्हा तिला समजले की रवी इतक्या मोठ्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, तेव्हा ती थक्क झाली.7 / 7रवी दुबेला 'लक्ष्मण'च्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रणबीर कपूरसह रवी मोठा पडदा नक्कीच गाजवेल, अशी चाहत्यांना खात्री आहे