Join us

कुठे आहे 'तेरे नाम' फेम सरफराज खान? जो बनला होता सलमान खानचा खास दोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 10:24 IST

1 / 6
Where is 'Tere Naam' Fame Sarfaraz khan : 2003 मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' एकच धमाका केला होता. राधे मोहनचा बेस्ट फ्रेंड 'असलम शेख' ची भूमिका करणारा सरफराज खान काही दिवस चांगलाच चर्चेत होता. पण अचानक तो बॉलिवूडपासून दूर गेला. यामागचं कारणही मोठं आहे.
2 / 6
डायरेक्टर सतीश कौशिक यांच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने सलमान खानला एक वेगळी ओळख दिली होती. या सिनेमाच्या माध्यमातून भूमिका चावलानेही बॉलिवूडमध्ये पाउल ठेवलं होतं. तसेच या सिनेमात सलमानचा सगळ्यात खास मित्र होत असलम शेख.
3 / 6
तेरे नाममध्ये असलम शेखची भूमिका करणारा अभिनेता सरफराज खान याला या सिनमातून खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याची एक वेगळी ओळख तयार झाली होती. त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. पण तो काही मोजक्याच सिनेमात दिसला. नंतर अचानक बॉलिवूडमधून गायब झाला. त्याने 1993 मध्ये शतरंज सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतंच त्याचा शेवटचा सिनेमा 2013 मधील 'रमैया वस्तावैया' होता.
4 / 6
आपल्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये सरफराजने केवळ 11 सिनेमे केले. जेव्हा तो बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरला नाही तेव्हा त्याने बॉलिवूडपासून दूर जाण्याचं ठरवलं. हे तर फार कमी लोकांना माहीत आहे की, सरफराज खान हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, लेखक कादर खान यांचा मुलगा आहे.
5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरात बालपणापासून अभिनयाचं वातावरण असल्यामुळे सरफराजला सुद्धा अभिनयात त्याचं करिअर बनवायचं होतं. पण वडील कादर खान यांना हे मान्य नव्हतं. कादर खान यांचं मत होतं की, मुलांनी शिकावं. मुलांनी आपल्या वडिलांचं ऐकलं आणि शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो पुन्हा एकदा वडिलांना अभिनयाबाबत विचारलं. तेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये काम सुरू केलं.
6 / 6
सिनेमात भलेही सरफराजला फार यश मिळालं नसेल, पण थिएटरमध्ये त्याने खूप नाव कमावलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लोकल ट्रेन', 'बड़ी देर की मेहरबान आते आते' आणि 'ताश के पत्ते' सारख्या नाटकांमधून त्याने खूप नाव कमवलं. आता तो मुंबईमध्ये अॅक्टिंग स्कूल चालवत असल्याची माहिती आहे.
टॅग्स :बॉलिवूडसलमान खान