Join us

पहिल्याच नजरेत आपल्या फॅनच्या प्रेमात पडला होता Thalapathy Vijay, फिल्मी आहे त्याची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 13:59 IST

1 / 8
नेहमीच सिने विश्वातील स्टार्सच्या लव्ह स्टोरी तुम्ही ऐकत किंवा वाचत असाल. पण आज आम्ही तुम्हाला अशा स्टारला भेटवणार आहोत जो त्याच्या डाय हार्ट फॅनच्याच प्रेमात पडला आणि काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर त्याने तिच्याशीच लग्न केलं. आम्ही सांगतोय टॉलिवूडचा सुपरस्टार थलापति विजय आणि संगीता सोरनालिंगमबाबत. थलापति विजयने कधी विचारही केला नसेल की, तो त्याच्या एखाद्या फॅनसोबत लग्न करेल.
2 / 8
तेच संगीतानेही कधी विचार केला नसेल की, ती ज्या अभिनेत्याची फॅन आहे, तो तिच्या प्रेमात पडेल आणि आयुष्यभरासाठी ते सोबत राहतील. दोघांची लव्हस्टोरी फारच रोमांचक आहे. चला जाणून सुपरस्टार विजय थलापतिची लव्हस्टोरी.
3 / 8
जेव्हा संगीता पहिल्यांदा विजयला भेटली तेव्हा तो सुपरस्टार नव्हता. तो साउथ फिल्म इंडस्ट्रीत आपली ओळख बनवण्यासाठी कठोर मेहनत करत होता आणि स्ट्रगल करत होता. यादरम्यान १९९६ मध्ये विजय त्याचा पहिला सिनेमा 'पूवे उनक्कगा' मुळे चर्चेत होता. हा सिनेमा भारतातच नाही तर परदेशातील तमिळ लोकांनी डोक्यावर घेतला होता. या सिनेमाने विजयला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
4 / 8
त्यानंतर विजय चेन्नईमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करत होता. तेव्हा संगीता त्याला सिनेमाच्या सेटवर अभिनंदन करण्यासाठी आली होती. त्याचा सिनेमा पाहिल्यापासून संगीता त्याला भेटण्यासाठी उत्सुक होती. संगीताने ठरवलं होतं की,, पर्सनली भेटूनच विजयचं अभिनंदन करेल. संगीता ही एका तमिळ उद्योगपतीची मुलगी आहे. जी त्यावेळी ब्रिटनमध्ये सेट झाली होती.
5 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संगीतासोबत पहिली भेट झाल्यावर विजयही तिच्यावर इम्प्रेस झाला होता. विजय यामुळे हैराण झाला होता की, संगीता लंडनहून त्याला भेटण्यासाठी भारतात आली होती. संगीतासोबतच्या पहिल्या भेटीतच विजयने तिला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
6 / 8
संगीता आणि विजयची पहिली भेट सिनेमाच्या सेटवर झाली होती. विजयच्या आई-वडिलांना संगीता फार आवडली होती. पण त्यांची कधी विचार नव्हता केला की, ती त्यांच्या घरची सून होईल. एका मुलाखतीत विजयच्या आईने सांगितलं होतं की, त्यांना संगीता पहिल्या नजरेतच आवडली होती आणि तिने त्यांच्या मनात घर केलं होतं.
7 / 8
या भेटीनंतर थलापति विजय आणि संगीता रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांनी साधारण ३ वर्षे एकमेकांना डेट केलं. नंतर हळूहळू त्यांच्या घरी हे समजलं. त्यानंतर विजयने संगीताला पुन्हा घरी बोलवलं. यावेळी विजयच्या वडिलांनी संगीताला विचारलं की, तू विजयसोबत लग्न करशील का? संगीताने लगेच होकार दिला.
8 / 8
त्यानंतर विजय आणि संगीताने २५ ऑगस्ट १९९९ मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती. साउथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार लग्नाला आले होते.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywood