1 / 9बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) खासगी आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत आहे. एकीकडे तिची लस्ट स्टोरी २ वेब सीरिज चर्चेत आहे तर दुसरीकडे तिच्या आणि विजय वर्मा रिलेशनशीपची चर्चा.2 / 9नो किसींग सीन ही पॉलिसी पाहून प्रोजेक्ट साइन करणाऱ्या तमन्ना भाटियाचा लस्ट स्टोरी २ मधील बोल्ड अंदाज पाहून सगळेच अवाक् झालेत. बोल्ड सीन्ससाठी तमन्ना कशी तयार झाली याचा खुलासा नुकताच तिने केलाय.3 / 9लस्ट स्टोरीज २मध्ये तमन्ना बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत बोल्ड सीन्स देताना दिसते आहे. इतके बोल्ड सीन्स असूनही ही सीरिज संपूर्ण कुटुंबासोबत बसून तुम्ही पाहू शकता असे ती सांगते.4 / 9एका मुलाखतीत तमन्नानं सांगितलं की, बालपणी कुटुंबासोबत बोल्ड सीन्स पाहताना मी अनकम्फर्टेबल व्हायचे. मी त्या लोकांमधील आहे ज्यांना आपल्या कुटुंबाबरोबर अशा प्रकारचे चित्रपट पाहायला कसेतरी वाटायचे.5 / 9सीन्स सुरू झाल्यानंतर मी इकडे तिकडे पाहायला सुरूवात करायचे. म्हणूनच मी माझ्या करिअरमध्ये एकही इंटिमेट सीन करायचा नाही असे ठरवले होते.6 / 9किसिंग सीन्स कसे दिले याबद्दल तमन्ना म्हणाली की, माझ्यासाठी अभिनेत्री होणे म्हणजे प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणारा प्रवास होता. जसे जशी मी पुढे जात राहिले तशी मला त्या इंटिमेट सीन्सची लाज वाटू लागली. पण हे मला पुढे असेच चालू ठेवायचे नाही. प्रेक्षकांना हेच पाहायचे असते.7 / 9ती पुढे म्हणाली की, आता माझा भ्रम तुटला आहे. त्यामुळे मी कलाकार म्हणून स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करत असून वेगवेगळी पात्र असलेले प्रोजेक्ट करून आनंद मिळवत आहे.8 / 9अशाप्रकारे तमन्नाने लस्ट स्टोरीजमध्ये तिची नो किसिंग पॉलिसी तोडून टाकली. तिने जे काही बोल्ड सीन्स दिलेत ते पाहून प्रेक्षक अवाक् झालेत.9 / 9बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत पहिल्यांदाच स्क्रीनवर रोमँटिन सीन्स शूट करण्याबद्दल तमन्ना म्हणाली की, विजय वर्माबरोबर सीन शूट करताना मी खूप रिलॅक्स होते. त्याच्याबरोबर खूप कम्फर्ट वाटला.