Join us

श्रीदेवीच्या प्रेमात बुडाला होता हा सुपरस्टार, लग्नही करणार होता पण अचानक लाईट गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:00 IST

1 / 7
श्रीदेवी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. श्रीदेवी आपल्यात नाहीत तरीही त्यांचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. एक सुपरस्टार अभिनेता श्रीदेवीशी लग्न करण्याच्या तयारीत होता.
2 / 7
रिअल लाईफमध्ये श्रीदेवीचं बोनी कपूरशी लग्न जरी झालं असलं तरीही भारतीय मनोरंजन विश्वातील एक सुपरस्टार अभिनेता तिला प्रपोज करणार होता.
3 / 7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे रजनीकांत. सुपरस्टार रजनीकांत हा श्रीदेवीच्या आकंठ प्रेमात बुडाला होता. इतकंच नव्हे रजनीकांतने श्रीदेवीशी लग्न करण्याचंही ठरवलं होतं.
4 / 7
एकदा श्रीदेवीच्या नवीन घराचा गृहप्रवेश होता. त्याचवेळी अभिनेत्रीला प्रपोज करायचा विचारही त्याच्या डोक्यात आला. पण नंतर एक अशी गोष्ट घडली, त्यामुळे रजनीकांतने हा विचार सोडून दिला
5 / 7
झालं असं की, गृहप्रवेशाच्या वेळी रजनीकांतने जसं घरात पाऊल ठेवलं तशी लाईट गेली. त्यामुळे रजनीकांतने धास्ती घेतली. हा अपशकून आहे, असं त्याला वाटलं. त्यामुळे तो श्रीदेवीशी काहीही न बोलता तिधून निघून गेला.
6 / 7
रजनीकांतने पुढे १९८१ साली लता रंगाचारी यांच्याशी लग्न केलं. तर श्रीदेवीने १९९६ साली बोनी कपूरशी लग्न केलं.
7 / 7
२४ फेब्रुवारी २०१८ साली श्रीदेवीचं अकस्मात निधन झालं. त्यामुळे रजनीकांत यांना मोठा धक्का बसला होता.
टॅग्स :श्रीदेवीरजनीकांतबोनी कपूरबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट