३० वर्ष मोठ्या फिल्ममेकरसोबत अभिनेत्रीने केलं लग्न, आईने केली गयावया; ८ वर्षांनी झाला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:19 IST
1 / 9शाहरुख खानचा १९९४ 'कभी हा कभी ना' सिनेमा आठवत असेलच. यामध्ये अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तिने (Suchitra Krishnamoorthi) अॅना ही मुख्य भूमिका साकारली होती.2 / 9सुचित्रा नंतर फार मोजक्या सिनेमांमध्ये दिसली. प्रोफेशनलपेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. 3 / 9सुचित्राने १९९९ साली फिल्ममेकर शेखर कपूरसोबत (Shekhar Kapur) लग्न केलं होतं. तेव्हा सुचित्रा २२ वर्षांची होती तर शेखर हे तब्बल ५२ वर्षांचे होते. शेखर कपूर तिच्याहून ३० वर्ष मोठे होते. तसंच शेखर यांचा त्याआधी एक घटस्फोट झाला होता.4 / 9सुचित्रा एकदा मुलाखती म्हणाली होती की, 'माझी आई अक्षरश: गयावया करत होती. शेखर कपूरसोबत लग्न करु नको म्हणून भीख मागत होती. शेखर खरं तर माझ्या आईच्याच वयाचे होते. '5 / 9'हवं तर अफेअर कर पण यांच्याशी लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक असंही आई शेवटी म्हणाली. ' मात्र तरी सुचित्राने लग्न केलंच.6 / 9अखेर काही वर्षांनी सुचित्रा आणि शेखर कपूर यांच्या बिनसलं. लग्नाच्या ८ वर्षांनी २००७ साली त्यांचा घटस्फोट झाला. सुचित्राने शेखर कपूर यांच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल आणि धोका दिल्याचा आरोप लावला. 7 / 9या आरोपांवर शेखर कपूर म्हणाले होते की, 'मी अनेक जणींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. रोमान्सशिवाय मी राहूच शकत नाही. पण मी प्रत्येक नात्यात समोरच्या व्यक्तीचा सम्मान केला.'8 / 9'नात्याचं स्वरुप बदलत गेलं. यामध्ये रोमान्स, शरीरसंबंध किंवा एकमेकांसोबत जगण्याचं वचन नव्हतं. पण ते नातं कायम राहिलं.' 9 / 9सुचित्राने शेखर कपूर यांच्याकडून भलीमोठी पोटगी घेतल्याचीही नंतर चर्चा झाली होती. सुचित्रा आणि शेखर यांना एक मुलगीही आहे जिचं नाव कावेरी आहे. ती २४ वर्षांची आहे.