SRK तुमच्यात घमेंड खूप आहे? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं 'ग्रेट' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:07 IST
1 / 10बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने आज आपल्या लाखो चाहत्यांशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला. 2 / 10शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना मेसेज अलर्ट दिला होता. थोड्याच वेळात मी आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. 3 / 10#AskSRk या हॅशटॅगने आपण मला प्रश्न विचारु शकता, असे शाहरुखने म्हटले होते. त्यानंतर, काही वेळातच शाहरुख ट्विटरवरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागला. 4 / 10ASKSRK या हॅशटॅगने शाहरुखला हजारो चाहत्यांनी प्रश्न विचारले, मात्र काही वेळातच त्यांनी आपला हा ट्रेंड बंद करण्यात असल्याचंही सांगितलं5 / 10दरम्यान, शाहरुखने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यावेली, अनेकांनी मेजशीर प्रश्नही विचारले. 6 / 10शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्याबद्दलचे प्रेम चित्रकला आणि टॅटूच्या माध्यमातून व्यक्त केले. 7 / 10शाहरुखला एका चाहत्याने, तु्म्हाला घमेंड खूप आहे, असं लोक म्हणतात, असा प्रश्न विचारला होता. त्यावर, शाहरुखने ग्रेट उत्तर दिलंय8 / 10नही यार मै इतना ग्रेट हूँ, मुझ मे बिलकूल इगो नही है... हाहा.. हाहा.. असे मेजशीर उत्तर शाहरुखने दिलंय. 9 / 10शाहरुखने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन चाहत्यांशी संवाद साधला. त्यामुळे, ट्विटरवरील फॉलोअर्संनाही आनंद झाला. 10 / 10पुढील आयपीएल मालिकेतील विजयासाठीही शाहरुखच्या केकेआर संघाला एका युजर्संने शुभेच्छा दिल्या. शाहरुखने त्याचेही आभार मानले आहेत.