Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती शिवगामीची भूमिका; 'या' एका कारणामुळे गमावला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 11:52 IST

1 / 9
बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन, सत्यराज, तमन्ना भाटिया हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते.
2 / 9
बाहुबलीच्या फ्रँचायझीच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेत्री राम्या कृष्णन हिने शिवगामी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
3 / 9
राम्याने साकारलेली शिवगामी ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. परंतु, राम्यापूर्वी ही भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर झाली होती.
4 / 9
शिवगामी देवी या भूमिकेसाठी एस एस राजामौली यांनी प्रथम अभिनेत्री श्रीदेवी यांना पहिली पसंती दिली होती. मात्र, या भूमिकेसाठी श्रीदेवीने मोठी रक्कम मानधन म्हणून मागितली होती. ज्यामुळे ही भूमिका राम्याच्या पदरात पडली.
5 / 9
शिवगामीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीने चक्क १० कोटींची मागणी केली होती. इतकंच नाही तर तिने मुंबई ते हैदराबादपर्यंत ज्या ठिकाणी सिनेमाचं चित्रीकरण होईल तेथे तिच्यासह तिच्या कुटुंबासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण हॉटेलचा मजला, प्रवास खर्च देण्याची मागणी केली होती.
6 / 9
एका मुलाखतीत एस.एस. राजामौली यांनी खुलासा केला होता की, श्रीदेवीसोबत शिवगामी बनण्यासाठीचा करार अयशस्वी झाला होता.
7 / 9
श्रीदेवीच्या या मागण्या ऐकून राजामौली यांनी तिच्या जागी शिवगामीची निवड केली.
8 / 9
राम्याने तिच्या भूमिकेला उत्तमरित्या न्याय दिला. त्यामुळे तिची भूमिका विशेष गाजली.
9 / 9
प्रभासची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला. या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली होती.
टॅग्स :बाहुबलीरम्या कृष्णनTollywoodप्रभास