मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:39 IST
1 / 11बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी (Sridevi). आज श्रीदेवी आपल्यात नाही तरीही तिचे सिनेमे पाहून आजही चाहत्यांचं मनोरंजन होतं.2 / 11 श्रीदेवी इतकी अप्रतिम अभिनेत्री होती की देशभरात तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. 3 / 11श्रीदेवी ही एकमेव महिला सुपरस्टार होती, जिचे चित्रपट फक्त तिच्या नावाने हिट व्हायचे.4 / 11श्रीदेवीचा देवावर प्रचंड विश्वास होता. तुम्हाला माहितेय श्रीदेवीनं एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्यासाठी ७ दिवसांचा उपवास केला होता. 5 / 11आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तो सुपरस्टार म्हणजे कर्नाटकातील एका मराठी कुटुंबात जन्मलेला शिवाजी राव गायकवाड अर्थात रजनीकांत. 6 / 11रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यात खूप चांगले संबंध होते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती.7 / 11डेक्कन क्रॉनिकलनुसार, २०११ मध्ये रजनीकांत यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. श्रीदेवी यांना ही बातमी कळताच त्या खूप अस्वस्थ झाल्या.8 / 11 तेव्हा रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी श्रीदेवीनं देवाकडे पार्थना केली होती. 9 / 11शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही श्रीदेवी गेली होती. फक्त पार्थनाचं नाही तर रजनीकांत यांच्यासाठी सात दिवस उपवासही केला होता. 10 / 11श्रीदेवी यांचे प्रयत्न कामी आले आणि रजनीकांत पूर्णपणे बरे होऊन सिंगापूरहून भारतात परत आले. रजनीकांत घरी परतल्यावनर श्रीदेवीनेपती बोनी कपूरसह रजनीकांत यांच्या घरी जात भेट घेतली होती.11 / 11 दुबईत एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेल्या असताना २४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीच निधन झालं होतं. श्रीदेवीच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आजही चाहते श्रीदेवीची आठवण जागवतात.