Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूरज बडजात्यांच्या 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटाची घोषणा, आयुषमानसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:11 IST

1 / 11
सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) बॉलिवूडमध्ये कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखले जातात. ९० च्या दशकात 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'विवाह' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. त्यांनीच सलमान खान (Salman Khan) 'प्रेम' नावाने ओळख मिळवून दिली.
2 / 11
पण, आता प्रेक्षकांना सूरज बडजात्या यांच्या आगामी 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटात 'प्रेम' या भूमिकेत सलमान नाही तर आयुषमान खुराणा झळकणार आहे.
3 / 11
आज सूरज बडजात्या यांनी त्यांच्या आगामी 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.
4 / 11
'यह प्रेम मोल लिया' हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
5 / 11
या चित्रपटाद्वारे आयुषमान खुराना प्रथमच राजश्री प्रॉडक्शन सोबत काम करत आहे. त्याच्या अभिनयातून या पात्राची साधी, निरागस आणि खोडकर बाजू पाहायला मिळणार आहे.
6 / 11
या चित्रपटात आयुषमानसोबत मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
7 / 11
तर ती आहे शर्वरी वाघ. शर्वरीचा साधेपणा आणि तिचे सौंदर्य राजश्री प्रोडक्शनच्या पारंपारिक नायिकेला साजेसे आहे.
8 / 11
काही दिवसांपुर्वी पीटीआयशी बोलताना, सूरज बडजात्या यांनी चित्रपटाचं शुटिंग सुरू असल्याची माहिती दिली होती.
9 / 11
विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी सूरज बडजात्या पुन्हा एकदा संगीतकार हिमेश रेशमियासोबत काम करत आहेत. याआधी दोघांनी 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात एकत्र काम केले होते.
10 / 11
'यह प्रेम मोल लिया' या चित्रपटाची कथा आणि इतर पात्रांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासारखा एक मोठा एंटरटेनर ठरणार, असे बोलले जात आहे.
11 / 11
टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूड