Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 16:12 IST

1 / 6
अनुष्का शर्मा- सेम सूट सेम अनुष्का शर्मासारखी दिसणाऱ्या ज्युलिया मायकलनं काही दिवसांपूर्वी तिचा आणि अनुष्काचा फोटो ट्विटरवर शेअर केला. ज्युलिया मायकल अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका आहे. आम्ही दोघी जुळ्या आहोत, असं ज्युलियानं ट्विटमध्ये म्हटलं. यावर अनुष्कानं विनोदी रिप्लायदेखील दिला. हो, मीदेखील कधीपासून तुलाच शोधत होते, असं अनुष्कानं म्हटलं.
2 / 6
आलिया भट- गली बॉयचा ट्रेलर प्रदर्शित होताच आलिया भटच्या लूकची तुलना बजरंगी भाईजानमधल्या लूकशी होऊ लागली. मात्र याचवेळी इन्स्टाग्रामवर एक टिकटॉक व्हिडीओ तुफान वायरल झाला. सनाया नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. यामधील मुलगी सेम टू सेम आलियासारखी दिसते आहे.
3 / 6
कतरिना कैफ- एमटीव्हीच्या सलोनी चोप्रानं तिचा फोटो मध्यंतरी शेअर केला होता. सलोनी बॉलिवूड अभिनेत्री कतरिनासारखी दिसते. तशा प्रतिक्रियादेखील अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या होत्या.
4 / 6
सलमान खान- काही दिवसांपूर्वीच सलमान खानसारखा दिसणारा एक जण कराचीमध्ये आढळला होता. कराचीतल्या एका बाजारामधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल धाला होता.
5 / 6
रणवीर सिंह- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसारखा दिसणारी एक व्यक्ती पाकिस्तानात राहते. त्या व्यक्तीचं नाव हम्माद शोएब असं आहे. शोएब हा मॉडेल आणि अभिनेता आहे.
6 / 6
सोनाक्षी सिन्हा- दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लूकची तुलना सुरुवातीला रिना रॉयशी व्हायची. मात्र आता तिची तुलना प्रिया मुखर्जीशी होते. प्रिया sonakshisinha_lookalike नावानं इन्स्टाग्रामवर आहे. प्रिया मुखर्जी सोनाक्षीची मोठी चाहती आहे.
टॅग्स :आलिया भटअनुष्का शर्माकतरिना कैफसलमान खानरणवीर सिंगसोनाक्षी सिन्हा