Join us
Daily Top 2Weekly Top 5

Singer KK Death: केकेच्या मृत्यूचं सत्य अखेर उघड; डोक्याच्या आणि चेहऱ्यावरील जखमांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:06 IST

1 / 6
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ उर्फ केके आज या जगात नाहीत. केकेच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला. मृत्यूपूर्वी गायकाने पत्नी ज्योती कृष्णाशी संवाद साधला होता. तब्येत ठीक नसून खांदे खुप दुखत आहेत असं केके यांनी पत्नीला कॉन्सर्टपूर्वी सांगितले.
2 / 6
ही गोष्ट केकेने त्याच्या मॅनेजरलाही सांगितली. आज खूप अस्वस्थ वाटतंय. शरीरात काही उत्साह नाही असं केके म्हणाला अशी माहिती कोलकाता पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. डोक्याला मार कसा लागला? याचाही खुलासा झाला आहे.
3 / 6
पोलिसांच्या सूत्रांनुसार, केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखम झाल्याच्या खूणा आहेत. त्यावर ते म्हणाले की, जेव्हा केके कॉन्सर्टहून बाहेर पडून त्याच्या हॉटेलला पोहचला तेव्हा आराम करण्यासाठी सोफ्यावर बसण्याचा प्रयत्न केला परंतु तोल गेल्याने ते खाली पडले.
4 / 6
त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागला. त्यानंतर तातडीने मॅनेजर, हॉटेल स्टाफच्या मदतीने गायकाला सीएमआरआयला घेऊन गेले. तपासावेळी पोलिसांना हॉटेलच्या रूममध्ये अनेक औषधं सापडली. यात एंटासिह, व्हिटामिन सीसह होमोपॅथिकची औषधं होती.
5 / 6
केके नियमितपणे डायजीन आणि एंटासिड औषधाचं सेवन करत होता. इतकेच नाही तर पोस्टमोर्टम रिपोर्टमधून याचा खुलासा झाला की केकेच्या ह्दयात ब्लॉकेज होते. पीटीआयशी बोलताना डॉक्टरांनी याचा खुलासा केला.
6 / 6
केकेच्या ह्दयात ८० टक्के छोटे छोटे ब्लॉकेज होते. कॉन्सर्टवेळी गायक गर्दीत फिरून डान्स करत होता. ज्यामुळे त्याची उत्साहित होण्याची पातळी वाढली. त्याचा परिणाम ह्दयापर्यंत रक्त पोहचणे बंद झाले. त्यामुळे अचानक त्याची तब्येत ढासळली असं पोस्टमोर्टममधून समोर आले आहे.
टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथ