अभिनयापूर्वी सिद्धार्थ करत होता 'या' क्षेत्रात करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 13:31 IST
1 / 8'बिग बॉस १४'चा विजेता आणि प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे चाहत्यांवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली असून सध्या सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा आहे. यामध्येच सिद्धार्थच्या करिअरची नेमकी सुरुवात कशी झाली ते पाहुयात.2 / 8१२ डिसेंबर १९८० मध्ये मुंबईत जन्म झालेल्या सिद्धार्थचे वडील अशोक शुक्ला एक सिव्हिव इंजिनिअर होते. तर आई होममेकर. सिद्धार्थ मॉडलिंग करत असतानाच त्याच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं.3 / 8 मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकलेल्या सिद्धार्थने इंटिरिअर डिझाइन या क्षेत्रात पदवी संपादन केली होती. विशेष म्हणजे त्याला स्पोर्ट्समध्येदेखील आवड होती. शाळेत असताना तो फूटबॉल टेनिस खेळायचा असं म्हटलं जातं.4 / 8अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सिद्धार्थ इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात काम केलं होतं. त्यानंतर त्याने २००४ मध्ये त्याने Gladrags Manhunt and Megamodel Contest मध्ये सहभाग घेतला आणि पहिला रनरअप ठरला.5 / 8त्यानंतर त्याने प्रसिद्ध गायिका ईला अरुण यांच्या रेशम का रुमाल या म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं. २००५ मध्ये त्याने World's Best Model या स्पर्धेत भाग घेतला. 6 / 8२००८ मध्ये त्याने 'बाबुल का आंगन छुटे' या मालिकेतून खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 'जाने पहचाने से...ये अजनबी', 'लव यू जिंदगी', 'जब वी मेट' या मालिकांमध्ये काम केलं.7 / 8अनेक मालिका केल्यानंतर 'बालिका वधु' या मालिकेतून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत त्याने शिव ही भूमिका साकारली होती.8 / 8छोट्या पडदा गाजवल्यानंतर सिद्धार्थने हंप्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इतकंच नाही तर एकता कपूरच्या 'ब्रोकन बट ब्युटीफूल ३'च्या माध्यमातून त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केलं होतं.