1 / 7१९७५ साली आलेला 'शोले' हा सिनेमा कोणी पाहिला नाही असा एकही माणूस आढळणार नाही. याच सिनेमातील एका अभिनेत्याला मात्र दोन वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगाच राहावं लागलं होतं2 / 7हा अभिनेता होता 'शोले' सिनेमात रहीम चाचांची भूमिका साकारणारे अभिनेते ए.के. हंगल. ज्येष्ठ अभिनेते ए. के. हंगल यांनी त्यांच्या कारकीर्दीत तब्बल ३०० सिनेमांमधून काम केलं3 / 7भारत-पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांनी कराचीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या कम्युनिस्ट विचारधारेमुळे त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अटक केली4 / 7त्यामुळे ए.के.हंगल यांना तब्बल २ वर्ष पाकिस्तानी तुरुंगात कारावास भोगावा लागला. त्यांना कारागृहात खूप मारहाण केली जायची, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.5 / 7पुढे खिशात फक्त २० रुपये घेऊन ए.के.हंगल मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी शिवणकाम करायला सुरुवात केली. हे काम करता करताच त्यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला.6 / 7त्यांनी 'शोले', 'दीवार', 'अभिमान', 'आंधी', 'नमक हराम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले7 / 7२०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचं शेवटचं आयुष्य फार हलाखीत गेलं.