शर्वरी वाघची बहीणही दिसते सुंदर, लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:56 IST
1 / 6मराठी कुटुंबात जन्माला आलेली अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आज बॉलिवूज गाजवत आहे. 'बंटी और बबली २' सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केलं. 2 / 6शर्वरीला लहानपणासूनच अभिनयाची आवड होती. तिने बॉलिवूडमध्ये सुरुवातीला सहायक दिग्दर्शिकेचंही काम केलं. नंतर तिला यशराज फिल्म्समधून मोठा ब्रेक मिळाला. आता ती थेट आलिया भट सोबत वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे.3 / 6शर्वरीच्या बहिणीचं नाव आहे कस्तुरी वाघ (Kasturi Wagh). दोघींच्या वागण्यात, बोलण्यात मराठी संस्कृती झळकते. दोघी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या नाती आहेत. 4 / 6कस्तुरी वाघही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कधीकधी तिच्याकडे पाहून शर्वरीचाच भास होतो इतक्या दोघी सारख्या दिसतात. कस्तुरी शर्वरीची मोठी बहीण आहे. 5 / 6कस्तुरी प्रसिद्धीझोतापासून दूरच असते. कधीतरी ती शर्वरीसोबत सिनेमाच्या स्क्रीनिंगला दिसली आहे. कस्तुरीची स्वत:ची आर्किटेक्चर फर्म आहे. 6 / 6येत्या डिसेंबरमध्ये कस्तुरी लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड विनीत हिंगोरनीसोबत ती लग्न करणार आहे. विनीत आणि ती मिळूनच त्यांची आर्किटेक्चर फर्म सुरु केली आहे. आता हेच बिझनेस पार्टनर्स खऱ्या आयुष्यातही पार्टनर होणार आहेत.