Pooja Dadlani : शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या आलिशान घराचे Photo व्हायरल, महिन्याला कमावते करोडो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 09:52 IST
1 / 9अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी त्याच्या कुटुंबाच्या अगदीच जवळची व्यक्ती आहे. त्यांच्या वाईट काळात पूजा शाहरुख आणि गौरीसोबत कायम उभी होती.2 / 9गेल्या अनेक वर्षांपासून ती शाहरुखची मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. नुकतेच पूजाच्या नवीन घराचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. शाहरुखची पत्नी इंटेरियर डिझायनर असलेल्या गौरी खाननेच पूजाचे घर डिझाईन केले आहे. 3 / 9पूजाचे हे घर कोणत्या आलिशान महलपेक्षा कमी नाही. या घराचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल रात्री शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान पूजाच्या घरी दाखल झाले. 4 / 9या फोटोंमधून गौरी आणि पूजा देखील किती क्लोज आहेत हे दिसते. एका फोटोत दोघीही काऊचवर बसल्या आहेत. आरशासमोर बसून त्या कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत.5 / 9मिंट कलरचा सोफा आणि वुडन टेबल्समुळे एक पूर्ण लुक घराला येत लिव्हिंग रुमला येत आहे. व्हिंटेज लॅम्प शेड्सने एक वेगळीच झळाळी येते. तर लिव्हिंग रुममध्ये लावलेला मोठा झुमर शोभा वाढवतोय.6 / 9नवीन घरात पहिलं पाऊल. आनंदी घराचे स्वप्न साकार झाले आहे. आणि याची सुरुवात गौरी खाननेच घर डिझाईन करत केली आहे यापेक्षा चांगली गोष्ट ती काय असेल. असं कॅप्शन देत पूजाने फोटो पोस्ट केले आहेत.7 / 9पूजाचे हे घर फारच भव्य आणि सुंदर दिसत आहे. खासकरुन लिव्हिंग रुम आकर्षकरित्या डिझाईन करण्यात आलं आहे. हे घर खरोखर स्वप्नातल्या घरासारखंच सुंदर आहे.8 / 9पूजा गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून शाहरुखची मॅनेजर आहे. ती त्यांच्या कुटुंबातलाच एक भाग बनली आहे. शाहरुखच्या ब्रॅंड एंडॉर्समेंट्सपासून ते क्रिकेट टीमपर्यंत सगळं काम ती सांभाळते. 9 / 9इतक्या वर्षांपासून अतिशय चोख काम करणारी पूजा पगारही तेवढाच भरभक्कम घेते. माध्यम रिपोर्टनुसार तिला वर्षाला सुमारे २० कोटी रुपये पगार मिळतो.