By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:40 IST
1 / 11बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे संजय दत्त.2 / 11अभिनेता संजय दत्तने मान्यतासोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. मात्र, अजूनही संजयच्या पहिल्या पत्नीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. 3 / 11संजयची लेक त्रिशाला अनेकदा तिच्या आईचे म्हणजेच संजयच्या पहिल्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असते.4 / 11मध्यंतरी त्रिशालाने तिच्या आईसोबतचा एक गोड फोटो शेअर केला होता. या फोटोवर संजयची तिसरी पत्नी मान्यता आणि बहीण या दोघींनीही कमेंट केली होती. तेव्हापासून संजयच्या पहिल्या पत्नीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.5 / 11विशेष म्हणजे संजय दत्तची पत्नी मान्यता हिच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्याची पहिली पत्नी आणि त्रिशालाची आई हिच्याविषयी फार कमी जणांना माहित आहे.6 / 11संजयची पहिली पत्नीदेखील कलाविश्वात सक्रीय होती. इतकंच नाही तर ती लोकप्रिय अभिनेत्रीदेखील होती.7 / 11संजयच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. परंतु, वयाच्या ३३ व्या वर्षीच रिचाने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे तिच्याविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.8 / 11संजयने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. वयाच्या ३३ व्या वर्षी कर्करोग झाल्यामुळेच रिचाचं निधन झालं. त्यावेळी त्रिलाशा फार लहान होती. 9 / 11त्रिशालाचा जन्मानंतर रिचाला कर्करोग झाला होता असं सांगण्यात येतं. त्यामुळे तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. याच वेळी संजय एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं.10 / 11एकीकडे दुखण्याने त्रस्त असलेल्या रिचाला संजयच्या अफेअरबद्दल समजलं ज्यामुळे मानसिक धक्का बसल्यामुळे तिने १० डिसेंबर १९९६ मध्ये जगाचा निरोप घेतला असं म्हटलं जातं.11 / 11रिचाच्या मृत्यूनंतर संजयने दुसरं लग्न केलं. परंतु, त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही. दुसऱ्या पत्नीपासूनही तो विभक्त झाला. त्यानंतर त्याने मान्यतासोबत तिसरं लग्न केलं.