Join us

IN PICS : काय सांगता? झालं गेलं विसरून सामंथा रूथ प्रभु थाटणार दुसरा संसार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 17:23 IST

1 / 8
‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ओ अंटवा’ या गाण्यामुळे चर्चेत आलेली साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु हिच्याबद्दल अफवांचा बाजार गरम आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेल्या सामंथाबद्दल आणखी एक बातमी कानावर येतेय.
2 / 8
सामंथा सध्या त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या मॅनेजरने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. पण या आजारावरच्या उपचारासाठी सामंथा परदेशात गेल्याचं कळतंय. अशात सामंथाबद्दल आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.
3 / 8
चर्चा खरी मानाल तर सामंथा दुसऱ्यांदा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. तिच्या आयुष्यातील एक व्यक्ती यासाठी तिचं मन वळवण्याचे प्रयत्न करतीये. सामंथाने नव्या आयुष्याची सुरूवात करावी, यासाठी ही व्यक्ती प्रयत्न करतेय.
4 / 8
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सामंथा आणि नाग चैतन्य यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. या घटस्फोटानंतर सामंथा डिप्रेशनमध्ये गेली होती. पण आता ती त्यातून पुरती बाहेर पडली आहे आणि आता तिने भूतकाळ मागे सोडून आयुष्यात नवं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
5 / 8
सामंथा जग्गी वासूदेव अर्थात सद्गगुुरू यांना गुरू मानते. त्यांच्यावर तिची अपार श्रद्धा आहे. चर्चेनुसार, सद्गगुरूंनी सामंथाला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
6 / 8
सद्गुरूंच्या या सल्ल्यावर सामंथाने गंभीरपणे विचार चालवला असल्याचं कळते. भुतकाळातील कटू आठवणी विसरून आयुष्यात पुढे जाण्यासाठी सदगुरू सामंथाला सतत प्रेरित करत असतात. त्यानुसार आता तिने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.अर्थात अद्याप सामंथाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
7 / 8
सामंथा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. गेल्या काही दिवसांत कुठल्याही कार्यक्रमातही दिसली नाही. अशा परिस्थितीत आता तिच्याशी संबंधित या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.
8 / 8
सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिचा ‘खुशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘यशोदा’ या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. ‘यशोदा’ हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा आहे.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywood