लहानशा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या Salman Khan कडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी; पाहा नेमका कशाकशात गुंतवलाय त्याने पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:43 IST
1 / 10बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खान कलाविश्वातील सर्वात हाइएस्ट रेटेड आणि पेड अॅक्टर म्हणून ओळखला जातो.2 / 10कलाविश्वात जितकं त्याचं वजन आहे तितकाच मोठा त्याचा फॅन फॉलोअर्सदेखील आहे. त्यामुळे त्याच्याविषयी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. 3 / 10सक्सेसफुली करिअरचा आलेख चढणाऱ्या सलमानकडे नाव, पैसा, रुतबा सारं काही आहे. मात्र, कोट्यवधींचा मालक असूनही सलमान एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहतो.4 / 10वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणारा सलमान कोट्यवधींचा मालक आहे. त्यामुळे त्याने त्याची आर्थिक गुंतवणूक नेमकी कशा कशात केलीये हे जाणून घेऊयात.5 / 10मुंबईत राहणाऱ्या सलमानने मुंबईपासून गोवा ते दुबईपर्यंत अनेक प्रॉपर्टींमध्ये पैसे गुंतवले आहेत. इतकंच नाही तर अन्य गोष्टींमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.6 / 10सगळ्यात पहिले त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटविषयी जाणून घेऊयात. या इमारतीत सलमान ग्राऊंड फ्लोअरला राहत असून त्याची किंमत १६ कोटी रुपये इतकी आहे.7 / 10सलमान खानचा पनवेलमध्येही फार्म हाऊस आहे. हा फार्म हाऊस त्याच्या बहिणीची अर्पिताचा आहे. मात्र, तो सलमान आणि त्याच्या भावांनी मिळून तिला गिफ्ट केल्याचं सांगण्यात येतं. या फार्महाऊसची किंमत ८० कोटी रुपये आहे.8 / 10सलमान खानचं दुबईमध्येही घरं आहे. बुर्ज खलिफाच्या जवळ डाऊनटाऊनमध्ये त्याने प्रॉपर्टी खरेदी केली आहे.9 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानचं वांद्र्यात आणखी एक triplex फ्लॅट आहे. ३० कोटी रुपयांचा हा 4BHK फ्लॅट असल्याचं सांगण्यात येतं. यात टॉप फ्लोअरला पूल, मिडल फ्लोअरवर पार्टी हॉल, पूल टेबल आहे. आणि, लोअर फ्लोअरवर लिव्हिंग एरिया आहे.10 / 10गोराईमध्येही सलमानने घर खरेदी केलं आहे. त्याच्या ५१ व्या वाढदिवशी त्याने हा आलीशान बीच हाऊस खरेदी केला होता. यात जीम, स्विमिंग पूल, मुव्ही थिएटर असं सारं काही आहे. हा बंगला साधारणपणे १०० एकर विस्तीर्ण जागेत उभारला आहे.