१९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'साठी कलाकारांना किती मानधन मिळालं होतं? अक्षय खन्नाला मिळालेले फक्त 'इतके' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:19 IST
1 / 7सनी देओलच्या 'बॉर्डर २' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा टीझर काल रिलीज झाला आणि सनी देओलच्या भूमिकेची पुन्हा चर्चा झाली2 / 7 'बॉर्डर २'मध्ये पाकिस्तानला धडकी भरवणारी सनी देओलची गर्जना सर्वांच्या मनात घर करुन राहिली आहे. 'बॉर्डर २' साठी सनी देओलने ५० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.3 / 7 'बॉर्डर २'साठी कोटींच्या घरात मानधन घेणाऱ्या सनी देओलला १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर' सिनेमासाठी मात्र फार कमी मानधन मिळालं होतं.4 / 7मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओलला 'बॉर्डर'साठी १.२ कोटी रुपये मिळाले होते. सिनेमातील तब्बूला २० लाख रुपये तर जॅकी श्रॉफ यांना ११ लाख रुपये मिळाले होते5 / 7सध्या धुरंधर गाजवणारा अक्षय खन्नाही 'बॉर्डर'मध्ये झळकला होता. अक्षय खन्नाला त्यावेळी १४ लाख रुपये इतकं मानधन मिळालं होतं.6 / 7 'बॉर्डर'साठी सुनील शेट्टीला सहा लाख, पूजा भटला १ लाख, कुलभुषण खरबंदा यांना ६ लाख तर पुनीत इस्सर यांना १० रुपये इतकं मानधन मिळालं होतं.7 / 7'बॉर्डर २' सिनेमा आता २०२६ ला भेटीला येणार आहे. सनी देओल पुन्हा एकदा जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.