Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:42 IST

1 / 7
'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात रिझवानची भूमिकाही चांगलीच गाजली. रिझवानने हा सिनेमा प्रपोगंडा आहे की नाही? यावर मोठं वक्तव्य केलंय.
2 / 7
बॉलिवूड कट अनकटला दिलेल्या मुलाखतीत रिझवानची भूमिका साकारणारा मुस्तफा अहमद म्हणाला की, 'एका माणसाचा प्रोपोगंडा, हा दुसऱ्या माणसाचा अजेंडा असतो. मला वाटतं की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हीच तर आपल्या देशाची संस्कृती आणि सौंदर्य आहे.''
3 / 7
''संविधान आपल्याला आपला विचार मांडण्याचा हक्क देतं. आणि शेवटी मला वाटतं की तुमचा उद्देश नेमका काय आहे, हेच महत्वाचं आहे. सगळा मुद्दा त्याभोवतीच फिरतो. मी हे खात्रीने सांगू शकतो की, मी चित्रपटात जी भूमिका साकारली आहे, त्यात मी कुठेही तडजोड केलेली नाही', असं मुस्तफा म्हणाला.
4 / 7
पुढे मुस्तफाने मोठं वक्तव्य केलं जे महत्वाचं आहे. तो म्हणाला, 'तुम्ही विचार करा. माझं नाव मुस्तफा अहमद आहे. आदित्य धर यांना माझ्यासोबत काम करण्याची काय गरज होती? जर हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला त्यांनी कास्टच केलं नसतं. माझ्याजागी त्यांनी महेश किंवा मुकेश नावाच्या एखाद्या व्यक्तीला घेतलं असतं ना.''
5 / 7
मुस्तफा अहमदने या 'धुरंधर २' सिनेमात हमजा अलीचा राईट हँड रिझवानची भूमिका साकारली. मुस्तफाला या भूमिकेसाठी मिळालेली संधी खूप खास आहे.
6 / 7
7 / 7
कारण मुस्तफाने याआधी रणवीर सिंग, यामी गौतम यांचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलं आहे. 'धुरंधर २'च्या निमित्ताने पहिल्यांदाच रिझवानला अभिनय करण्याची संधी मिळाली.
टॅग्स :धुरंधर सिनेमाबॉलिवूडरणवीर सिंगसंजय दत्तअर्जुन रामपाल