Join us

कुठे 'लाल दुपट्टे'वाली अभिनेत्री? गोविंदासोबत केला होता रोमान्स, आता बघाल तर बघतच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:43 IST

1 / 10
अनेकदा असं होतं की, एका सिनेमातून रातोरात स्टार झालेले कलाकार काही महिन्यांनी अचानक इंडस्ट्रीमधून गायब होतात. असंच काहीसं 90च्या दशकातील अभिनेत्री रितु शिवपुरी (Ritu Shivpuri) सोबत झालं. 48 वर्षीय रितु शिवपुरी बरीच वर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. चला जाणून घेऊ ती आता कुठे आहे.
2 / 10
गोविंदाचा 'आंखे' सिनेमा 1993 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होऊन 30 वर्षे झाली. या सिनेमातील सगळ्याच कलाकारांचा लूक आता खूप बदलला आहे. या सिनेमाती गोविंदासोबत चंकी पांडे, रितु शिवपुरी, रागेश्वरी, शिल्पा शिरोडकर आणि कादर खान यांच्या भूमिका होत्या. गोविंदाने या सिनेमात रितु शिवपुरीसोबत रोमान्स केला होता.
3 / 10
या सिनेमातील सगळीच गाणी आजही लोकांना आठवतात. त्यातील एक खास गाणं म्हणजे ‘ओ लाल दुपट्टे वाली’ (O Lal Dupatte wali song) हे आहे. या गाण्यातून रितुला खूप लोकप्रियता मिळाली होती. आजही तिचे फॅन्स तिची या गाण्याद्वारे आठवण काढतात.
4 / 10
'आंखें' सिनेमानंतर रितु 'आर या पार', 'हम सब चोर हैं', 'भाई भाई', काला साम्राज्य, 'लज्जा, शक्ति-द पॉवर', 'ऐलान', 'एक जिंद इक जान', 'रॉक डांसर', 'ग्लॅमर गर्ल', 'हद कर दी आपने' सारख्या सिनेमात दिसली.
5 / 10
22 जानेवारी 1975 मध्ये मुंबईत जन्मलेली रितु शिवपुरी बॉलिवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते ओम शिवपुरी आणि सुधा शिवपुरी यांची मुलगी आहे. रितुला अभिनयाचे धडे घरातूनच मिळाले होते.
6 / 10
रितुने तिच्या करिअरची सुरूवात मॉडल म्हणून केली होती. एका इव्हेंट दरम्यान पहलाज निहलानी यांनी तिला पाहिलं आणि आंखे सिनेमाची ऑफर दिली. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा ती 17 वर्षांची होती.
7 / 10
या सिनेमात रितुने फॅन्सचं मन जिंकलं असली तरी नंतर आलेले तिचे सगळे सिनेमे फ्लॉप झाले होते. बॉलिवूडमध्ये काही झालं नाही तर ती साऊथकडे गेली.
8 / 10
साऊथ इंडस्ट्रीमध्ये काही दिवस काम केल्यानंतर रितुने सिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. ब्रेक घेण्याचं कारण तिच्या पतीचा आजार झालं. रितुने हरि वेंकटसोबत लग्न केलं आणि तिला तीन मुले आहेत. तिच्या पतीला पाठीत ट्युमर झाला होता. अशात रितुने करिअरपेक्षा फॅमिलीला जास्त महत्व दिलं.
9 / 10
जेव्हा पती बरा झाला तेव्हा रितुने पुन्हा एकदा 2016 मध्ये अनिल कपूरचा शो 24 मधून कमबॅक केलं. यात रितु डॉक्टर सनी मेहताच्या भूमिकेत होती. त्यानंतर तिने छोट्या पडद्यावर डेब्यू केलं जे यशस्वी ठरलं.
10 / 10
2017 मध्ये रितु 'इस प्यार को क्या नाम दूं- 3' मालिकेत दिसली. त्यानंतर 2019 मध्ये ती 'नजर' आणि 'विष' मालिकेत दिसली. आता रितु ज्वेलरी डिझायनर बनली आहे. ती पती आणि मुलांसोबत मुंबईत राहते. ती सोशल मीडियावर अॅक्टिव आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी