Join us  

IN PICS : 10 वर्षांपासून कुठं गायब आहे रिमी सेन? पाहा तरी आता कशी दिसते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 6:25 PM

1 / 8
हंगामा, बागबान, दीवाने हुए पागल, गोलमान अलिमिटेड असे अनेक चित्रपट करणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या कुठेय? तर अ‍ॅक्टिंग सोडून वेगळ्याच कामात बिझी आहे.
2 / 8
एकेकाळी बॉलिवूड गाजवणा-या या रिमीचा आज वाढदिवस. आज ती 40 वा वाढदिवस साजरा करतेय.
3 / 8
रिमीने अनेक हिट सिनेमे दिलेत आणि अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला. गेल्या 10 वर्षांपासून रिमी बॉलिवूडपासून दूर आहे. कारण काय तर रिमी म्हणे थकली होती. होय, एका मुलाखतीत तिने बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले होते.
4 / 8
आता मी अभिनय करणार नाही. कारण अभिनय मी कधीचाच सोडला आहे. त्याकाळात मला काम मिळत होते, म्हणून मी काम करत होते. पण एकक्षण असा आला की, माझे काम मला कंटाळवाणे वाटू लागले. कॉमेडी चित्रपट करून करून मी थकून गेले. इतके की नंतर मी अभिनय कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणाली होती.
5 / 8
अभिनेत्री रिमी सेनचा जन्म 21 सप्टेंबर 1981ला कोलकत्ता, पश्चिम बंगालमध्ये झाला होता. रिमचं खरं नाव रिमी नव्हे तर शुभोमित्रा सेन असं आहे. मात्र आज ती रिमी या नावानेच ओळखली जाते.
6 / 8
2003 मध्ये आलेल्या तुफान कॉमेडी 'हंगामा' या चित्रपटातून रिमी सेनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये परेश रावल, आफताब शिवदाससानी, अक्षय खन्ना, शोभना आनंद, राजपाल यादव, शक्ती कपूर यांसारखी तगडी स्टारकास्ट होती.
7 / 8
धूम, गरम मसालानंतर तिला सलमान खानसोबत ‘क्योंकी’ या सिनेमात संधी मिळाली. यानंतर दीवाने हुऐ पागल, फिर हेराफेरी, गोलमाल अशा सिनेमातही तिची वर्णी लागली.
8 / 8
यानंतर तिने राजकारणातही हात आजमावला. भाजपात ती सामील झाली. पण तिथेही ती फार रमली नाही. आता रिमीने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात काम करतेय.
टॅग्स :बॉलिवूड