Join us
Daily Top 2Weekly Top 5

IN PICS : कंगना राणौतनं का अटेंड केली सलमानची ईद पार्टी? आत्ता केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:40 IST

1 / 8
कंगना राणौतला बॉलिवूड पार्ट्यांचं किती वावडं आहे, हे नव्यानं सांगायला नको. पण अलीकडे सलमान खानची बहिण अर्पिता खाननं दिलेल्या ईद पार्टीत सामील होऊन कंगनानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
2 / 8
बॉलिवूडच्या ‘खान’ मंडळींशी कंगनाची जुनी खुन्नस. अशात ती सलमान खानच्या पार्टीत गेली म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या पार्टीला तिनं हजेरी लावण्यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
3 / 8
तर आता कंगनाने याचं उत्तर दिलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कंगना सलमानची ईद पार्टी आणि भाईजानसोबत तिचं असलेलं कनेक्शन यावर बोलली.
4 / 8
तू सलमानच्या पार्टीत कशी काय गेलीस? काही खास कारण? असा प्रश्न या मुलाखतीत कंगनाला विचारला गेला. यावर तिने काय उत्तर दिलं माहितीये? सलमान माझा चांगला मित्र असल्याचं ती म्हणाली.
5 / 8
‘मी पार्ट्यांना जात नाही, असं मुळीच नाही. जिथे जायला आवडतं, तिथे मी नक्की जाते. सलमान माझा चांगला मित्र आहे. त्याने मला फोन करून पार्टीला बोलवलं होतं. त्यामुळे मी गेली, बस्स इतकंच,’असं ती म्हणाली.
6 / 8
या पार्टीनंतर सलमानने कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर शेअर केला होता. यामुळे कंगना चांगलीच खुश्श झाली होती. तिने सलमानचे आभार मानले होते.
7 / 8
मी बॉलिवूडमध्ये एकटी आहे, असं यापुढे कधीच म्हणणार नाही, असं तिने सलमानचे आभार व्यक्त करत म्हटलं होतं. एकंदर काय तर सलमान व कंगनाची मैत्री आता जगजाहिर झाली आहे. कंगनाला एक ‘खान’ मित्र म्हणून मिळाला आहे.
8 / 8
कंगना सध्या ‘धाकड’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिचा हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. यात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल व दिव्या दत्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
टॅग्स :कंगना राणौतसलमान खानबॉलिवूड