1 / 10सध्या चित्रपटांमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामधील वयाच्या गणिताचा फारसा विचार केला जात नाही. जर चित्रपटातील अभिनेता ४० वर्षाचा असेल तर अभिनेत्री त्याच्या अर्ध्या वयाच्या असल्याचे पाहावयास मिळते. या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान, आमिर खान यांची नावे येतात. आता यात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचाही समावेश झाला आहे. 2 / 10रणवीर सिंगनं त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केलाय. आज रणवीर सिंगच्या वाढदिवशी त्याच्या आगामी 'धुरंधर' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर (Ranveer Singh Dhurandhar First Look ) प्रदर्शित करण्यात आलाय. 3 / 10 'धुरंधर'मध्ये रणवीर एका धाकड अवतारात दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीरसोबत एक नवी अभिनेत्री दिसली आहे. ही अभिनेत्री रणवीरच्या अर्ध्या वयाची आहे.4 / 10रणवीरसोबत दिसलेल्या या अभिनेत्रीचं नाव सारा अर्जुन आहे. सारा अर्जुन ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे.5 / 10सध्या रणवीरचं वय ४० वर्ष आहे. तर सारा अर्जून ही २० वर्षीय आहे. अर्थातच दोघांमध्ये तब्बल २० वर्षांचा फरक आहे. 6 / 10'धुरंधर'च्या टीझरमधील रणवीर आणि सारा यांच्यातील रोमँटिक सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या वयातील मोठ्या फरकावर आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर काहींनी बॉलिवूडमधील अशा ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 7 / 10दरम्यान, साराबद्दल जाणून घ्यायचं झाल्यासं तिनं खूप लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती पाच वर्षांची होईपर्यंत तिने १०० हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. २०११ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'देईवा थिरुमगल'मधून सारा अर्जुन घराघरात पोहचली. या सिनेमानंतर सारा एक बालकलाकार म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली.8 / 10यानंतर सारा अर्जुननं अनेक हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केला. हिंदी सिनेमात ‘एक थी डायन’, ‘404’, ‘जज्बा’ आणि ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली. याशिवाय, ती ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील 'पोन्नियिन सेलवन: भाग I आणि II' या भव्य ऐतिहासिक चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे.9 / 10'धुरंधर' हा चित्रपट येत्या ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शनपटात रणवीरसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि यामी गौतम यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. 10 / 10'धुरंधर'नंतर रणवीर फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'डॉन-३' मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सनॉन दिसणार आहे.