Join us

बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:45 IST

1 / 9
नितेश तिवारींच्या 'रामायण'ची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्री राम तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
2 / 9
'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट आता समोर आली आहे. या सिनेमात अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे.
3 / 9
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सिनेमात हनुमानची भूमिका साकारणार आहे.
4 / 9
तर दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
5 / 9
रवी दुबे लक्ष्मण तर लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारणार आहे.
6 / 9
कागज अग्रवाल मंडोदरी आणि रकुल प्रीत सिंग शुपर्णखाच्या भूमिकेत पाहायला मिळेल.
7 / 9
विवेक ओबेरॉय विद्युतजीव्हा ही भूमिका साकरणार आहे. तर दशरथाच्या भूमिकेत राम म्हणून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल दिसतील.
8 / 9
शीबा चढ्ढा मंथरा आणि इंदिरा क्रिष्णन कौशल्याची भूमिका साकारतील.
9 / 9
'रामायण'मध्ये मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेची वर्णी लागली आहे. आदिनाथ या सिनेमात राजा भरत ही भूमिका साकारणार आहे.
टॅग्स :रणबीर कपूररामायणआदिनाथ कोठारे