Join us

फिरोझ खान पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:09 IST

1 / 10
सध्या देशभरात 'ऑपरेशन सिंदूर'ची (Operation Sindoor) चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.
2 / 10
लष्करानं आतापर्यंत पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, सवाई, बिलाल, कोटली, बरनाळा, सरजाल आणि महमूना ही ९ ठिकाणं नष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.
3 / 10
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर, एक जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. एकदा एका बॉलिवूड अभिनेत्यानं थेट पाकिस्तानात जाऊन भारताचे गौडवे गायले होते. यानंतर हे प्रकरण इतकं तापलं की पाकिस्ताचे राष्ट्रपतींनी त्या अभिनेत्यावर बॅन घातलं होतं.
4 / 10
तो अभिनेते दुसरे तिसरे कोणी नाही तर दिवंगत अभिनेते फिरोज खान होते.
5 / 10
हा किस्सा २००६ साली घडला होता. फिरोज खान हे त्यांचा भाऊ अकबर खान यांच्या 'ताजमहाल: अ‍ॅन इंटरनल लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानला गेले होते.
6 / 10
तिथे एका पार्टीदरम्यान एका पाकिस्तानी अँकरने मनीषा कोईराला यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. तेव्हा फिरोज खान यांनीही संबंधित व्यक्तीला जोरदार प्रत्युत्तर दिले.
7 / 10
यावेळी पाकिस्तानमधल्या त्या पार्टीत फिरोज खान म्हणाले होते, 'मला अभिमान आहे की मी भारतीय आहे. आमच्या देशात (भारत) मुस्लिम प्रगती करत आहेत. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे जिथे मुस्लिम राष्ट्रपती आणि शीख पंतप्रधान आहेत. येथे सर्व धर्मांना समान अधिकार आहेत, तर पाकिस्तानमध्ये मुस्लिम मुस्लिमांना मारत आहेत'.
8 / 10
ऐवढेच नाही तर त्या पार्टीत फिरोज खान यांनी हेही स्पष्ट केले की ते स्वतः पाकिस्तानात आलेले नाहीत. त्यांना इथे बोलावण्यात आले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
9 / 10
फिरोज खान यांच्या तोंडून भारताचं कौतुक हे तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अजिबात सहन झालं नाही.त्यांनी थेट फिरोज खान यांना पाकिस्तानात येण्यास बंदी घातली.
10 / 10
दरम्यान, फिरोज खान यांचे २००९ मध्ये निधन झाले. ते शेवटचे २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' चित्रपटात दिसले होते. पण, पाकिस्तानमध्ये प्रतिध्वनीत झालेले 'भारत माता की जय' चे नारे आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.
टॅग्स :फिरोज खानपाकिस्तानभारतपरवेझ मुशर्रफ