Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prabhas ने अजून का केलं नाही लग्न? ४२ वयात सांगितलं अविवाहित असण्याचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:57 IST

1 / 7
साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी 'राधे श्याम' सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली होती. आता नुकताच या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
2 / 7
यावेळी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये प्रभासने मीडियासोबत संवाद साधला. यात काही पर्सनल लाइफबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने लग्नाबाबत सांगितलं आणि तो आतापर्यंत अविवाहित का आहे? हेही सांगितलं.
3 / 7
या इव्हेंटमध्ये प्रभासला प्रश्न विचारण्यात आला होता की, 'त्याने त्याच्या लग्नाबाबत कधी भविष्यवाणी केली आहे का?'. यावर प्रभासने उत्तर दिलं की, 'अनेकदा माझं प्रेमाबाबतचं प्रीडिक्शन चुकीचं ठरलं. त्यामुळे आतापर्यंत माझं लग्न झालं नाही'. प्रभासने हे उत्तर देताच उपस्थित सगळेच हसू लागले होते.
4 / 7
प्रभास यावेळी म्हणाला की, 'सिनेमात मी भलेही भविष्यवाणी करतो. पण रिअल लाइफमध्ये अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही'. इव्हेंटमध्ये अशाप्रकारच्या अनेक गोष्टींवर गप्पा झाल्या.
5 / 7
दरम्यान कधीकाळी अभिनेता प्रभासचं नाव साऊथची अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत (Anushka Shetty) जोडलं गेलं होतं. इतकंच नाही तर दोघे लग्न करणार अशीही चर्चा झाली होती. असंही म्हटलं जातं की, प्रभासनेच तिचं लग्न थांबवलं होतं. दोघांच्या अफेअरची चर्चा खूप झाली होती.
6 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टी २०१५ मध्येच लग्न करणार होती. पण तिचा मित्र आणि को-स्टार प्रभासनेच तिला बाहुबली सीरीजवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अनुष्काने प्रभासचा सल्ला गंभीरतेने घेतला होता.
7 / 7
प्रभासचे फॅन्स त्याच्या 'राधे श्याम' सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. त्यासोबतच प्रभास आणखी काही मोठे सिनेमे येणार आहेत. ज्यात 'सालार' आणि 'आदिपुरूष' या सिनेमांचा समावेश आहे. आदिपुरूषचा फर्स्ट लूकही जारी करण्यात आला आहे.
टॅग्स :प्रभासबॉलिवूडअनुष्का शेट्टीलग्न