अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:26 IST
1 / 9अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांनी सोबत अनेक सिनेमे केले. त्यांची जोडी हिट होती आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही लोकांना पसंत होती. परवीन बाबीचं 2005 मध्ये निधन झालं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. परवीन बाबीने निधनाच्या खूप वर्षाआधी अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता.2 / 9बॉलिवूडमध्ये 70 आणि 80 च्या दशकात परवीन बाबी खूप फेमस होती. त्यावेळच्या सगळ्यात ग्लॅमरस हिरोईनपैकी ती एक होती आणि फॅशनच्या बाबतीत ती फार बोल्ड होती. 3 / 9डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, परवीन बाबीने एकदा अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिचा आरोप होता की, अमिताभ यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. मात्र कोर्टाने अमिताभ यांना क्लीन चीट दिली होती.4 / 9परवीन बाबीबाबत नंतर बातमी समोर आली होती की, ती पॅरानॉइड सिजोफ्रॅनिया नावाच्या मानसिक आजाराने पीडित आहे. याती पीडित व्यक्ती बुद्धी भ्रमित होते. 5 / 9मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन परवीन बाबीबाबत म्हणाले होते की, तिचा आजार असा होता की, तिला लोकांची भिती वाटत होती आणि ती सगळ्या प्रकारच्या भ्रमाने पीडित होती.6 / 9मीडिया रिपोर्टनुसार, परवीन 1983 मध्ये एका सिनेमाच्या सेटवर अचानक गायब झाली होती. अफवा अशी होती की, अंडरवर्ल्डच्या लोकांनी तिला गायब केलं होतं. तिने अनेक सिनेमे ती गायब झाल्यावर रिलीज झाले.7 / 9परवीन जेव्हा 6 वर्षांनी परत आली तेव्हा ती म्हणाली होती की, आध्यात्मासाठी तिने फिल्मी दुनिया सोडली होती. नंतर समोर आलं की, ती पॅरानॉइड सिजोफ्रॅनियाने ग्रस्त आहे. पण तिने असा काही आजार असल्याचं नाकारलं होतं. ती म्हणाली की, लोकांना तिला पागल सिद्ध करायचं आहे.8 / 9परवीन बाबी मानसिक आजाराने पीडित होती तेव्हा तिचं अफेअर महेश भट्टसोबत सुरू होतं. महेश भट्ट विवाहित असूनही त्यांचं अफेअर सुरू होतं. असं म्हणतात की, महेश भट्ट यांनी त्यांच्या अफेअरवर ‘अर्थ’ हा सिनेमा बनवला होता.9 / 9हा सिनेमा बघून परवीन बाबीची हालत खराब झाली होती. पण सिनेमाच्या डायरेक्टरने सांगितलं होतं की, असं काही नाहीये. नंतर 2006 मध्ये महेश भट्ट वो लम्हे सिनेमा घेऊन आले. हा सिनेमा परवीन बाबीच्या जीवनावर बनवला होता. ज्यात शायनी आहुजा आणि कंगना रनौत होती.