By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:32 IST
1 / 9 'घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रस्ते में है उसका घर' हे गाणं ऐकलं नसेल असा एकही सिनेरसिक आढळणार नाही. ९० दशकात लोकप्रिय झालेल्या या गाण्यात सुंदर बोलके डोळे आणि मोहक हास्याने अनेक सिनेरसिकांना क्लीनबोल्ड करणारी अभिनेत्री मयुरी कांगो.2 / 9 मयुरी कांगो हिचा जन्म १५ ऑगस्ट १९८२ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला. औरंगाबादच्या सेंट झेवीयर स्कूलमध्ये तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. 3 / 9 मयुरीला अभिनय क्षेत्राची ओढ आई सुजाता कांगो यांच्यामुळे लागली. त्या नाटकाच्या उत्तम अभिनेत्री आहेत. आईच्या प्रेरणेतूनच ती सिनेक्षेत्राकडे वळली. 4 / 9 आपल्या आईला भेटण्यासाठी मुंबईत आलेल्या मयुरीची त्यावेळी दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्याशी भेट झाली. तेव्हा मिर्झा यांनी तिच्यातील प्रतिभा हेरली. मग त्यानंतर 'नसिम' या चित्रपटातून तिनं १९९५ मध्ये अभिनय विश्वात पाऊल ठेवलं.5 / 9 बाबरी मशिदीचा ढाचा तोडल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा बॉलिवूड चित्रपट होता. खरेतर त्यावेळी ती १० वीत होती. त्यामुळे हा चित्रपट स्वीकारण्यास ती तयार नव्हती. मात्र मिर्झा व आई सुजाता कांगो यांच्या आग्रहाखातर तिने ही भूमिका स्वीकारली.6 / 9 त्यानंतर मयुरीला जुगल हंसराज यांनी 'पापा कहते है' (१९९६) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत घेतलं. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही. मात्र या चित्रपटातील स्वीटी आनंदच्या भूमिकेतील तिचा अभिनय मात्र सर्वांचे लक्ष वेधून गेला. यातील 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उसका घर' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.7 / 9 यानंतर मयुरीने 'बेताबी', 'होगी प्यार की जीत'आणि 'बादल'या चित्रपटांमध्ये अभिनय केला. असंही सांगितलं जातं त्यावेळी मयुरीने जवळपास १०-१५ चित्रपट साइन केले, मात्र,त्यापैकी बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले नाही. त्यामुळे तिने हिंदी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावलं. 8 / 9 मयुरीने २००३ मध्ये आदित्य ढिल्लन या अनिवासी भारतीय उद्योगपतीसोबत विवाह केला. लग्नानंतर मयुरीने चित्रपटसृष्टीला निरोप दिला आणि पुढील उच्च शिक्षण घेण्याचे ठरविली. लग्नानंतर अमेरिकेत न्यूयॉर्क येथे राहण्यास गेली. २००५ मध्ये बारूच कॉलेज ऑफ झिकलिन स्कूल ऑफ बिझनेसमधून विपणन आणि वित्त या विषयात एमबीएची पदवी मिळवली. 9 / 9शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्क येथील एका अग्रणी ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये तिने काम करण्यास सुरुवात केली. अवघ्या ८ वर्षातच कंपनीच्या सिनिअर डायरेक्टर पदी तिची निवड झाली. मार्च २०१९ मध्ये, मयुरीने गुगल इंडियामध्ये उद्योग-एजन्सी व्यवसायाची प्रमुख म्हणून सामील झाली. तिने गूगलची नोकरी सोडून पब्लिसिस ग्रुपच्या ग्लोबल डिलिव्हरी (PGD) च्या सीईओ म्हणून दाखल झाली आहे.आज ब्यूटी विथ ब्रेन असणारी ही अभिनेत्री अनेकांना आय.टी.क्षेत्रात प्रेरणा देणारी ठरली आहे.