Join us

पल्लवी जोशीची लेक 'मल्लिका'! निरागस चेहरा अन् मधाळ डोळे; आता कशी दिसते पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:03 IST

1 / 9
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'ची आठवण काढली की सूत्रसंचालिका पल्लवी जोशी (Pallavi Joshi) डोळ्यासमोर येते. तिचं गोड हसू, तिचं बोलणं, सौंदर्य याचं नेहमीच कौतुक झालं.
2 / 9
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'ची आठवण काढली की सूत्रसंचालिका पल्लवी जोशी (Pallavi Joshi) डोळ्यासमोर येते. तिचं गोड हसू, तिचं बोलणं, सौंदर्य याचं नेहमीच कौतुक झालं.
3 / 9
तिचा भाऊही लहान वयात अभिनेता होता. त्याला 'मास्टर अलंकार'म्हणून ओळखलं जायचं. अनेक हिंदी सिनेमात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीच्या भूमिकेत ते अनेकदा दिसले.
4 / 9
पल्लवी जोशीने १९९८ साली पंजाबी असलेल्या विवेक अग्निहोत्रींशी लग्नगाठ बांधली. दोघांचं लव्हमॅरेज. आज पल्लवी आणि विवेक यांनी बनवलेले सिनेमे राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय असतात.
5 / 9
पल्लवी आणि विवेक यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची लेक मोठी असून तिचं नाव मल्लिका आहे. तर मुलाचं नाव मनन आहे.
6 / 9
मल्लिकाचे फोटो पाहून तिच्यातही आईचं सौंदर्य उतरल्याची जाणीव होते. पंजाबी आणि मराठी अशा दोन्ही संस्कारांमध्ये वाढलेली मल्लिका दिसायला अतिशय सुंदर आहे. तिचे मधाळ डोळे अगदी लहान वयापासूनच लक्ष वेधून घेत आहेत.
7 / 9
मल्लिकाने जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. नंतर तिने मुंबई युनिव्हर्सिटी आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे.
8 / 9
आईवडिलांप्रमाणेच मल्लिकालाही चित्रपट निर्मितीत रस आहे. काही सिनेमांमध्ये तिने सहायक दिग्दर्शक आणि सह निर्माती म्हणून कामही केलं आहे.
9 / 9
पल्लवीच्या मुलाचं नाव मनन अग्निहोत्री आहे. लेक आईवर तर मुलगा वडिलांप्रमाणेच हँडसम दिसत आहे. पल्लवीने कुटुंबासोबतचे अगदी मोजकेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टॅग्स :पल्लवी जोशीविवेक रंजन अग्निहोत्रीबॉलिवूड