Nysa Devgan : अजय देवगणच्या लेकीचा आणखी एक पार्टी लुक, नेटकरी म्हणतात, 'सर्जरीची...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:49 IST
1 / 8आजकाल स्टारकिड्समध्ये चर्चा आहे ची अजय देवगण आणि काजोलच्या लेकीची.न्यासा देवगणचा बदललेला लुक आणि स्टायलिश अवतार यामुळे ती अनेकदा फारच ट्रोल होत असते.2 / 8न्यासा नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. कधी बॉलिवुडच्या पार्टीत कधी स्टारकिड्ससोबत, कधी तिचा मित्र ओरीसोबत तर कधी आई वडिलांबरोबरचे तिचे फोटो व्हायरल होत असतात. 3 / 8गेल्या रविवारीही न्यासाला पापाराझींनी एका पार्टीतून बाहेर येताना कॅप्चर केले. लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये न्यासा बोल्ड दिसत होती. डीप नेक स्लीव्हलेस शॉर्ट लाल वन पीस मध्ये तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.4 / 8मोकळे केस आणि गळ्यात एक नाजूक पेंडंट असा न्यासाचा लूक होता. तर यासोबत तिने बेंज रंगाची सॅंडल घातली होती.5 / 8न्यासा यावेळीही ट्रोल झाली आहे. मात्र काही जणांनी तिची स्तुतीही केली आहे. तरी न्यासाचा इतका बदललेला चेहरा एकंदर लुक काही नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला नाही.6 / 8न्यासासोबत यावेळी आणखी एका स्टारकिडने लक्ष वेधले ते म्हणजे अर्जुन रामपालची मुलगी मीहिका रामपाल. ती देखील सर्वांसोबत पार्टीत सामील झाली होती.7 / 8मीहिकाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पोल्का डॉटेड स्कर्ट घातला होता. मीहिका आणि न्यासा सोबतच पार्टीतून गप्पा मारत बाहेर पडल्या.8 / 8एकीकडे न्यासाचा असा लुक तर दुसरीकडे आई वडिलांसोबत ती अगदी साध्या लुकमध्ये दिसून येते. नुकताच तिचा आणि अजय देवगणचा विमानतळावरील फोटो व्हायरल झाला होता ज्यात न्यासाचा अगदीच सिंपल लुक होता.