Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nora Fatehi : दिलबर गर्ल! गरिबीत गेलं बालपण, वेट्रेसचं केलं काम; आता आहे बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 15:56 IST

1 / 10
नोरा फतेही आज बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन बनली आहे. नोराला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं. नोराचा यशस्वी प्रवास जाणून घेऊया....
2 / 10
अतिशय खडतर प्रवास करून बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केल्याचं नोराने सांगितलं. ती वयाच्या 16 व्या वर्षांपासून काम करत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कुटुंबाची जबाबदारी नोराच्या खांद्यावर होती.
3 / 10
नोराने आपल्या भावाला मोठं करण्यासाठी कठोर परिश्रम केले. तिने टेलीमार्केटिंग, वेट्रेसिंग, बार्टेंडिंग आणि कॅफेमध्ये काम केलं आहे. याच दरम्यान नोराला तिची स्वप्नं अपूर्ण राहत असल्याचं जाणवलं.
4 / 10
हीच ती वेळ होती जेव्हा तिने अभिनेत्री होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. नोरा मोरोक्कोहून भारतात आली तेव्हा तिचा संघर्ष काही कमी नव्हता. संधीच्या शोधात तासनतास रांगेत उभं राहावं लागलं. पण नोराने हार मानली नाही
5 / 10
नोराने 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' आणि प्रकाश झा यांच्या प्रोजेक्टमधून चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. इंडस्ट्रीत अनेक नकारांना सामोरे जावे लागल्यानंतरही नोराने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
6 / 10
अवघ्या 5000 रुपये घेऊन भारतात आलेली नोरा आज बॉलीवूडमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. नोरा फतेहीने आपल्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे.
7 / 10
नोराच्या डान्सची तुलना माधुरी दीक्षितशी केली जाते.नोरा फतेहीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी केली आहेत, ज्यात दिलबरपासून साकी-साकीपर्यंत अनेक लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे.
8 / 10
9 / 10
10 / 10
टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड