1 / 11बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरचा जन्म राजस्थानमधील पिलानी येथील एका शीख कुटुंबात झाला. निम्रत ही दिवंगत मेजर भूपेंद्र सिंग यांची मुलगी आहे.2 / 11निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंग यांची १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. त्यावेळी अभिनेत्री ११-१२ वर्षांची होती.3 / 11ईटाइम्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, अभिनेत्रीने तिचे वडील भूपेंद्र सिंग यांच्याबद्दल खास माहिती शेअर केली होती.4 / 11निमरत कौर म्हणाली की, 'ते एक यंग आर्मी मेजर होते, एक इंजिनियर होते जे वेरीनाग नावाच्या ठिकाणी आर्मीच्या बॉर्डर रोड्सवर तैनात होता. वडील काश्मीरला गेले तेव्हा आम्ही पटियालाला राहिलो.'5 / 11'१९९४ च्या जानेवारी महिन्यात, आम्ही आमच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलो होतो.'6 / 11'दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनने कामाच्या ठिकाणाहून त्यांचं अपहरण केलं आणि सुमारे एक आठवडा त्यांना बंदी बनून ठेवलं.'7 / 11'दहशतवाद्यांनी वडिलांना सोडण्याच्या बदल्यात काही दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती, जी नाकारण्यात आली. अशा परिस्थितीत वडिलांना दहशतवाद्यांनी मारलं.'8 / 11'जेव्हा वडिलांचं निधन झालं तेव्हा ते फक्त ४४ वर्षांचे होते. आम्हाला माहिती मिळताच, आम्ही त्यांचं पार्थिव घेऊन दिल्लीला परतलो.'9 / 11'वडिलांच्या निधनानंतर आमचं आयुष्य रातोरात बदललं. जीवनशैली बदलली असली तरी सैन्य तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं.'10 / 11'ते तुमचं कुटुंब बनतात आणि आजही, जर तुम्हाला काही हवं असेल तर ते लगेच येतील आणि तुमच्यासाठी काहीही करतील.'11 / 11'मला असंही वाटतं की ते माझ्या वडिलांच्या सद्भावनेमुळे आणि लोकांशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे आहे' असं निमरत कौरने म्हटलं आहे.