Join us

बाहुबली फेम 'कट्टपा' उर्फ 'सत्यराज'कडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, जाणून घ्या किती घेतात मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 12:06 IST

1 / 8
'कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा था' हे तर आता सर्वांनाच माहीत आहे. कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता कोण हेही तुम्हाला माहीत असेलच. पण त्याची लाइफस्टाईल कशी आहे? त्याच्याकडे संपत्ती किती आहे? किती कार्स आहेत हे फार क्वचित लोकांना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.
2 / 8
रजनीकांतपासून ते कमल हसन यांच्यापर्यंत साउथ इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा भारी कलाकार आहेत. जे लोकप्रियतेत बॉलिवूड स्टार्सच्या खूप पुढे आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे सत्यराज(Sathyaraj). सत्यराज हा तोच कलाकार आहे ज्याने कटप्पाची भूमिका साकारली. त्याचं पूर्ण नाव रंगराज सुबियाह (Rangaraj Subbiah) आहे. पण इंडस्ट्रीत ते सत्यराज नावाने प्रसिद्ध आहेत.
3 / 8
अभिनेता सत्यराज तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. तमिळ इंडस्ट्रीत त्यांनी अभियनयाच्या करिअऱची सुरूवात १९७८ मध्ये निगेटिव्ह भूमिकेने केली होती. यानंतर त्यांना वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या.
4 / 8
१९८७ मध्ये त्यांनी हिरो म्हणून केलेला 'वेधम पुधिथु' सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर नादिगन, अमैधि पदाई, पेरियार आणि ओनबाधु रूबाई नोट्टू सिनेमात ते मुख्य भूमिकेत दिसले.
5 / 8
सत्यराज २०१२ साली आलेल्या बॉलिवूडच्या ३ इडियट्सच्या तमिळ व्हर्जन नानबन, राजा राणी, बाहुबली, बाहुबली २ आणि काना सिनेमात सहायक भूमिकेत दिसले. खासकरून बाहुबली सिनेमाने त्यांना नॅशनल स्टार बनवलं. अभिनयासोबतच सत्यराज दिग्दर्शकही आहेत. त्यांनी विलाधी विलेन सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात ते तीन भूमिकेत दिसले होते.
6 / 8
सत्यराज आज साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी आतापर्यंत साधारण २२० सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच ३ सिनेमांची निर्मितीही केली आहे. तर एका सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. इतकं काम केल्यावर आज ते कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
7 / 8
६७ वर्षीय सत्यराज गेल्या ४२ वर्षापासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. ते एक सिनेमासाठी २ ते ३ कोटी रूपये मानधन घेतात. बाहुबली सिनेमासाठी त्यांनी २ कोटी रूपये घेतले होते.
8 / 8
त्याशिवाय टीव्ही शोमध्ये चीफ गेस्ट म्हणून आणि काही जाहिरातींमधूनही ते कमाई करतात. Idolnetworth.com नुसार, सत्यपाल यांची एकूण संपत्ती ८० कोटी रूपये आहे.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी