1 / 11दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. आज तिला कुठल्या परिचयाची गरज नाही. फक्त भारतचं नाही तर जगभरात तिला ओळखलं जातं. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.2 / 11दीपिक ही चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे जितके चर्चेत असते, तितकंच तिच खासगी आयुष्य हे चर्चेत राहिलं आहे. 3 / 11आज दीपिका ही रणवीर सिंगची पत्नी आणि त्याच्या बाळाची आई आहे. पण रणवीरच्या आधी ही बॉलिवूडची मस्तानी आयुष्यात अनेकदा प्रेमात पडली होती. 4 / 11नुकतंच तिचा Ex बॉयफ्रेंड अभिनेता आणि सुपरमॉडेल मुझम्मिल इब्राहिमनं (Muzammil Ibrahim) सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिकावर भाष्य केलंय. अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 5 / 11दीपिका आणि मुझम्मिल इब्राहिम यांनी बराच काळ एकमेंकाना डेट (Deepika Padukone In A Relationship With Muzammil Ibrahim) केलं होतं. दीपिकासोबतच्या त्याच्या पहिल्या भेटीपासून ते ब्रेकअपपर्यंतची संपूर्ण अभिनेत्यानं सांगितली.6 / 11सिद्धार्थ कन्नन यानं त्याला दीपिकासोबतच्या अफेअरबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला, 'मला वाटत नाही की आपण याबद्दल बोलावं. कारण आता ती विवाहित आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि अजूनही आहोत. मी तिचा खूप आदर करतो, ती खूप चांगली मुलगी आ. आम्ही दोघेही एकाच वयाचे आहोत. आम्ही दोन वर्षे डेट केलं. मी मुंबईत तिला भेटलेला पहिला मुलगा होतो'. एवढंच नाही तर दीपिकानं त्याला प्रपोज केलं होतं, असाही खुलासा त्यानं केला. 7 / 11दीपिकासोबत ब्रेकअपचं कारण तो स्वत: होता, असं मुझम्मिल इब्राहिमनं सांगितलं. तो म्हणाला, 'अहंकारामुळे कधीच काहीही घडले नाही. काही इतर कारणे होती. नात्यांमध्ये काही गोष्टी घडतात'8 / 11दीपिकासोबत ब्रेकअप केल्याचा पश्चात्ताप आहे का? यावर प्रश्नावर तो म्हणाला, ' मला त्याचा पश्चात्ताप नाही. मी एक सक्त माणूस आहे. त्यावेळी मी एक स्टार होतो, ती फक्त एक मॉडेल होती. मी अभिनेता देखील होतो, माझ्याकडे सर्व काही होतं, पण आता तसं राहिलं नाही आणि ती सुपरस्टार झाली आहे'.9 / 11मुझम्मिल पुढे म्हणाला, 'आज मला कोणीही ओळखत नाही, पण सगळे तिला ओळखतात. मीदेखील तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचे चित्रपट पाहायला आवडतात. ती एक खूप सुंदर स्त्री आहे आणि ती खूप चांगले काम करत आहे'10 / 11पुढे तो म्हणाला, 'माझ्या आईला ती खूप आवडते. दीपिका खूप चांगली मुलगी आहे. मुजम्मिल एक सुपरमॉडेल आहे. त्याने पूजा भटच्या धोखा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 11 / 11दरम्यान दीपिका सध्या 'स्पिरीट' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या सिनेमातून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.