Join us  

हुबेहूब आईप्रमाणे दिसते मुमताजची लेक; पण बोल्डनेसच्या बाबतीत करतीये भल्याभल्या अभिनेत्रींवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 11:43 AM

1 / 12
उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मुमताज.
2 / 12
१९६१ मध्ये स्त्री या चित्रपटातून मुमताज यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आणि, पाहता पाहता त्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झाल्या.
3 / 12
६०-७० चा काळ गाजवणाऱ्या मुमताज यांचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांची वरचेवर चर्चा होत असते.
4 / 12
सध्या सोशल मीडियावर मुमताज यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे. मुमताज यांच्या लेकीचं नाव तान्या असं आहे.
5 / 12
तान्या कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा रंगत असते.
6 / 12
सोशल मीडियावर सक्रीय असलेली तान्या वरचेवर तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करते.
7 / 12
मुमताज यांना दोन लेकी आहेत. मात्र, तान्या सध्या सोशल मीडिया सेन्सेशन असल्याचं पाहायला मिळतं.
8 / 12
तान्याचं लग्न झालं असून तिचं सासरचं आडनाव माधवानी आहे. इतकंच नाही तर तिला एक बाळदेखील आहे.
9 / 12
बाळाच्या जन्मानंतर तान्याने तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष दिलं. त्यामुळे आज ती एखाद्या २०-२५ वर्षीय तरुण इतकी ग्लॅमरस दिसते.
10 / 12
तान्या वरचेवर तिच्या लेकासोबतचे फोटो शेअर करत असते.
11 / 12
तान्या फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवरही मात करत आहे.
12 / 12
बऱ्याचदा ती तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
टॅग्स :मुमताजबॉलिवूडसेलिब्रिटी