Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल ठाकूरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंय का? इंडस्ट्रीतच करते काम; सौंदर्यातही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:34 IST

1 / 8
सर्वांची लाडकी 'सीता महालक्ष्मी' अर्थात मृणाल ठाकूर आज बॉलिवूड आणि साउथमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. मूळची धुळ्याची असलेली मृणाल आपल्या सौंदर्याने, बोलण्याच्या शैलीने आणि अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडते.
2 / 8
मृणाल ठाकूर तर सर्वांच्या परिचयाची आहेच. पण तुम्हाला मृणालच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहिती आहे का? 'लोचन' ही मृणालची सख्खी मोठी बहीण आहे.
3 / 8
मृणाल आणि लोचन यांच्यात सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळते. सोशल मीडियावर मृणाल अनेकदा लोचनसोबतचे मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. मृणालच्या यशात लोचनचा मोठा वाटा असल्याचं ती अभिमानाने सांगते.
4 / 8
लोचन ठाकूर मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) आहे. मृणालच्या अनेक प्रोफेशनल शूट्स आणि इव्हेंट्ससाठी लोचनच तिची स्टाईलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम पाहते.
5 / 8
लोचन ठाकूर जरी कॅमेऱ्यासमोर अभिनय करत नसली, तरी तिचा फॅशन सेन्स अतिशय उत्कृष्ट आहे. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स असून तिचे स्टाईलिश फोटो पाहून चाहते थक्क होतात ती स्वतः एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसते अशी चाहते प्रतिक्रिया देतात.
6 / 8
जेव्हा जेव्हा मृणाल लोचनसोबतचे फोटो पोस्ट करते, तेव्हा कमेंट्सचा पाऊस पडतो. 'दोघी बहिणींमध्ये जास्त सुंदर कोण?' असा प्रश्न चाहते अनेकदा विचारतात. लोचनच्या साध्या पण प्रभावी लूकचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
7 / 8
मृणालने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोचन केवळ तिची बहीण नाही तर ती तिची सर्वात मोठी टीकाकार आणि मार्गदर्शक आहे. चित्रपटांच्या निवडीपासून ते रेड कार्पेट लूकपर्यंत लोचन नेहमी मृणालच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
8 / 8
आज मृणाल ठाकूर आघाडीची अभिनेत्री आहे, तर लोचन पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या 'ठाकूर सिस्टर्स'ची जोडी सध्या सिनेसृष्टीत आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूड