Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिकांमध्ये हिरोईनच्या बहिणीची भूमिका, आज बॉलिवूड-साउथमध्ये मराठी अभिनेत्रीचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:32 IST

1 / 8
कुमकुम भाग्य' या टीव्हीवरील गाजलेल्या मालिकेत बुलबुल हे पात्र साकारणारी अभिनेत्री आठवतेय? आज तीच हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीचा चेहरा बनली आहे.
2 / 8
ही आहे सर्वांची लाडकी मृणाल ठाकूर. मालिकांमध्ये काम करत असताना मृणालने कधीच आपले स्वप्न सोडले नाही. अनेक ऑडिशन्स आणि नकारांनंतर तिला 'लव्ह सोनिया' या आंतरराष्ट्रीय चित्रपटातून मोठी संधी मिळाली.
3 / 8
'सुपर ३०' मध्ये हृतिक रोशनच्या नायिकेची भूमिका साकारून मृणालने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
4 / 8
केवळ हिंदीच नव्हे तर साऊथमध्येही मृणालने इतिहास रचला. 'सीता रामम' मधील तिच्या सीता महालक्ष्मीच्या भूमिकेने तिला घराघरांत पोहोचवलं आणि ती खऱ्या अर्थाने ग्लोबल स्टार बनली.
5 / 8
आज मृणाल अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करते. मुंबईत तिचे स्वतःचे हक्काचे आलिशान घर असून तिच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शनही आहे.
6 / 8
रिपोर्टनुसार, मृणाल ठाकूरची एकूण संपत्ती (Net Worth) आता ३३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी ती २ ते ३ कोटी रुपये मानधन घेते.
7 / 8
दर महिन्याला ती ६० लाखांची कमाई करते. शिवाय ब्रँड्स, एंडॉर्समेंट्समधून तिला पैसे मिळतात. तिचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.
8 / 8
२०२५ मध्ये मृणाल अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग आहे. टीव्हीवर 'बहीण' म्हणून आलेली ही मुलगी आज इंडस्ट्रीत 'लीडिंग लेडी' म्हणून ओळखली जाते, हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडमराठी अभिनेता