Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतकी नाजुक इतकी सुंदर! मराठी अभिनेत्रीचं मनमोहक फोटोशूट; वरुण धवनसोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:36 IST

1 / 8
सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मराठी अभिनेत्रीने हिंदी आणि साऊथमध्येही यश मिळवलं आहे. तिच्या सौंदर्यावर तर प्रेक्षक फिदाच आहेत.
2 / 8
ही अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. ती मूळची धुळ्याची असून 'विटी दांडू' या मराठी सिनेमात तिने काम केलं आहे. 'कुमकुम भाग्य' या हिंदी मालिकेतही ती दिसली. नंतर तिने हिंदी आणि साऊथ सिनेमे गाजवले.
3 / 8
मृणालचा सोशल मीडियावरही दबदबा आहे. तिचे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात. नुकतंच तिने अतिशय देखणं फोटोशूट शेअर केलं आहे.
4 / 8
युकेमधील एका नयनरम्य ठिकाणचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. आजूबाजूला गवत आणि फुलांचा बहर आला आहे. यामध्ये मृणालही एखाद्या फुलाप्रमाणेच नाजूक दिसत आहे.
5 / 8
स्कीन रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट असा तिचा क्युट लूक आहे. केसही छान सेट केले आहेत. कानात आणि हातात साजेसे अॅक्सेसरीज आहेत.
6 / 8
मृणालचं हे फोटोशूट पाहून चाहते पुन्हा तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. 'सनशाईन' अशी कमेंट तिच्या फोटोंवर आली आहे.
7 / 8
'है जवानी तो इश्क होना है' सिनेमासाठी मृणाल टीमसोबत स्कॉटलंडमध्ये होती. नुकतंच सिनेमाचं स्कॉटलंडमधील शेड्युल संपलं. डेव्हिड धवन यांचा हा सिनेमा आहे.
8 / 8
यामध्ये वरुण धवन, पूजा हेगडे, जिमी शेरगिल, चंकी पांडे, मौनी रॉय यांचीही भूमिका आहे. सिनेमाच्या टीमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूरमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्बॉलिवूड