Join us

अजय देवगणच्या 'दृश्यम'मधील ही चिमुरडी आता दिसते अशी, मराठी सिनेमातही तिने केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:41 IST

1 / 9
अजय देवगणचा 'दृश्यम' चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचंही खूप कौतुक झालं. त्याच्यासोबतच चित्रपटातील त्याची छोटी मुलगी 'अनू'ची भूमिका साकारणारी मृणाल जाधव हिच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती. ही अभिनेत्री आता कुठे आहे आणि काय करते आहे, ते जाणून घेऊयात.
2 / 9
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणने आपल्या कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. पण 'दृश्यम' चित्रपटाला जे प्रेम मिळालं, ते फार कमी चित्रपटांना मिळालं. हा एक यशस्वी आणि सुपरहिट चित्रपट फ्रँचायझी आहे, ज्याला खूप यश मिळालं. या चित्रपटातील कलाकारही खूप प्रसिद्ध झाले होते.
3 / 9
या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका श्रिया सरनने केली होती. तर मोठ्या मुलीची भूमिका तनुश्री दत्ताची लहान बहीण इशिता दत्ताने केली होती. या चित्रपटात अजय देवगणची आणखी एक छोटी मुलगी होती, जिचं नाव होतं 'अनू'. ही भूमिका मृणाल जाधवने साकारली होती आणि तिच्या निरागस अभिनयाने तिने सर्वांची मनं जिंकली होती.
4 / 9
'दृश्यम' चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. यात मृणाल जाधवने 'अनू साळगावकर'ची भूमिका केली होती. चित्रपटातील पोलीस तपासणीच्या सीनमध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांना खूप प्रभावित केलं होतं.
5 / 9
मृणाल जाधवचा जन्म २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता. ती आता १७ वर्षांची झाली असून तिने काही प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. तिने 'दृश्यम २'मध्येही काम केले आहे.
6 / 9
'पेइंग घोस्ट', 'अंड्याचा फंडा', 'भयभीत' आणि 'तू ही रे' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
7 / 9
'तू ही रे'मध्ये ती स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.
8 / 9
मृणाल लाइमलाइटपासून दूर राहते, पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे ५००० हून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती या प्लॅटफॉर्मवर तिचे फोटो शेअर करत असते.
9 / 9
मृणालला लहान वयातच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ती आता मोठी झाली आहे, पण तिची निरागसता अजूनही तशीच आहे.
टॅग्स :दृश्यम 2अजय देवगण