1 / 7ए.आर. रहमान हे एक प्रतिभावंत म्युझिशिअन आहेत आणि केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांची लोकप्रियता आहे. त्यांना ऑस्करसारख्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते नेहमीच त्यांच्या म्युझिकमुळे चर्चेत राहतात. नुकतच त्यांच्या मुलीचं लग्न पार पाडलं.2 / 7ए.आर.रहमान गाणे लिहितात, ते गातात आणि त्यांच्यासाठी संगीत तयार करतात. गाणी प्रोड्यूसही करतात. त्यांना फॅन्स प्रेमाने 'इसाई पुयाल' आणि 'मोजार्ट ऑफ मद्रास' म्हणतात. त्यांनी संगीताच्या माध्यमातून खूप नाव कमावलं आणि संपत्तीही कमावली. एका रिपोर्टनुसार, ए.आर.रहमान यांची एकूण संपत्ती जवळपास २१०० कोटी रूपयांची आहे. 3 / 7चेन्नईमध्ये एक विशाल बंगला - ए.आर.रहमान हे चेन्नईमध्ये एका विशाल बंगल्यात आपल्या परिवारासोबत राहतात. या बंगल्याचं इंटेरिअर फारच सुंदर आहे. यात एक मोठा डायनिंग एरिया, लिविंग रूम, एंटरटेन्मेंट झोन आणि जॉइंट म्युझिक स्टुडिओ आहे.4 / 7Los Angeles मध्ये अपार्टमेंट - गोल्डन ग्लोबल पुरस्कार विजेते रहमान यांचं हॉलिवूडमध्ये येणं-जाणं असतं. ते तिकडे बरंच काम करत असतात. त्यामुळे त्यांनी Los Angeles मध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्यांनी हे घर आरामासाठी आणि शांतपणे म्युझिक कंपोज करण्यासाठी घेतलं.5 / 7लंदन, मुंबई, चेन्नई आणि Los Angeles मध्ये स्टुडिओ - ए.आर.रहमान यांच्या अनेक ठिकाणी स्टुडिओ आहेत. जसे की, लंडन, चेन्नई, मुंबई आणि Los Angeles. यात ते त्यांचं काम करतात.6 / 7लक्झरी कार्स - ए.आर.रहमान यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. यात ९३.८७ लाख रूपयांची Volvo SUV, १.०८ कोटी रूपयांची Jaguar आणि २.८६ रूपयांची Mercedes चा समावेश आहे.7 / 7ए.आर. रहमान किती घेतात फी ? - फेमस संगीतकार ए.आर.रहमान हे एका सिनेमाला संगीत देण्यासाठी ९ ते १० कोटी रूपये मानधन घेतात. त्याशिवाय लाइव्ह शो सुद्धा करतात. यासाठी ते प्रति तासासाठी १ ते २ कोटी रूपये चार्ज करतात.