By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:09 IST
1 / 11व्हायरल 'महाकुंभ गर्ल' मोनालिसा भोसले हिने केरळमध्ये फरमान खानशी केलेल्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हटल्यामुळे दिग्दर्शक सनोज मिश्रा अडचणीत सापडले आहेत. 2 / 11'द डायरी ऑफ मणीपूर' या चित्रपटाला तर विरोध होत आहेच, शिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवारही आहे. सनोज मिश्रा यांनी आजतकशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलं.3 / 11सनोज यांनी सांगितलं की, त्यांनी मोनालिसाला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानलं होतं. तिला ब्रेक दिला, तिच्या कुटुंबावर असलेलं लाखांचं कर्ज फेडलं. मात्र, ती एका कटाची बळी ठरली आणि त्यांच्याच विरोधात खोटे गुन्हे दाखल करू लागली. 4 / 11मोनालिसाने केलेले बलात्काराचे आरोप खोटे असून अवघ्या १५ दिवसांत सर्व काही कसं बदलू शकतं? असा सवाल त्यांनी केला. तसेच चित्रपटाची मुख्य अभिनेत्रीच 'लव्ह जिहाद'ची शिकार झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शनही रखडलं आहे.5 / 11'ज्या प्रेक्षकांसाठी मी चित्रपट बनवला, ज्या धर्मांतराच्या मुद्द्यावर आणि लव्ह जिहादवर चित्रपट बनवला, तो मुद्दाच जेव्हा संपला, तेव्हा हा चित्रपट कोण पाहणार? जेव्हा चित्रपटाची हिरोईनच लव्ह जिहादची शिकार झाली आहे आणि देशात इतका विरोध होत आहे, तेव्हा चित्रपट कोण पाहणार?'6 / 11'जेव्हा मी मोनालिसाला भेटलो, तेव्हा तिच्यावर १ लाखाचं कर्ज होतं. मी तिला १ लाख रुपये दिले आणि ते कर्ज फेडले. त्यानंतर जे मानधन ठरलं होतं त्याव्यतिरिक्त, पहिल्या दिवसापासून तिच्या राहण्याचा, खाण्यापिण्याचा आणि येण्या-जाण्याचा सर्व खर्च माझी जबाबदारी होती.'7 / 11'जी मुलगी आता माझ्यावर गंभीर आरोप करत आहे, ती १५ दिवसांपूर्वी काय म्हणत होती? १५ दिवसांपूर्वी ती मला 'वडील' आणि 'गॉडफादर' मानत होती. माझ्यामुळे तिचं आयुष्य बदललं असं सांगत होती. मग १५ दिवसांत हा बदल कसा झाला? हा बदल तिच्यामुळे नाही, तर तिच्या मागे असलेल्या फरमानमुळे झाला.'8 / 11'फरमान हा मोनालिसाच्या वडिलांना साधूच्या वेशात भेटला होता आणि त्याने स्वतःचं नाव 'लवी' असल्याचं सांगितलं होतं. त्याने तुमच्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्टार बनवेन असं आमिष दाखवून 'सनोज यांना सांगू नका' अशी अट घातली होती.' 9 / 11'या लालसेपोटी या लोकांनी ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. त्यामुळे केरळमध्ये काय षडयंत्र शिजत आहे, हे मला कळू शकलं नाही. मोनालिसाचे ब्रेनवॉश झाल्यामुळे तिनेही कधी यावर भाष्य केलं नाही.'10 / 11'आता फरमानचे गुन्हेगारी रेकॉर्ड समोर येत आहेत. तो गुन्हेगार आहे, त्याने कोणाला तरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. बागपतमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, तिथूनच तो पळून गेला आहे.'11 / 11'माझ्याकडे तिच्या वयाचा कोणताही पुरावा नाही. जर ती सज्ञान असती आणि तिने स्वतः निर्णय घेतला असता, तर मी मध्ये पडलो नसतो. पण आई-वडिलांना न्याय हवा आहे. दीड वर्ष ती माझ्यासोबत होती, त्यामुळे तिची विचार करण्याची क्षमता किती आहे हे मला ठाऊक आहे' असं सनोज यांनी म्हटलं.