मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ मूळ गावी मोरगावात साजरी करतेय गणेश चतुर्थी, पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:34 IST
1 / 8आज सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. थाटामाटात बाप्पाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) गणेश उत्सवासाठी तिच्या मूळगावी मोरगावात गेली आहे आणि तिथे तिने गणेश चतुर्थी साजरी केली आहे.2 / 8शर्वरी वाघ दरवर्षी कुटुंबासोबत तिच्या मूळ गावी मोरगाव येथे गणेश चतुर्थी साजरी करते. या ठिकाणी त्यांचा १०० वर्ष जुना वाडा आहे. तिथे घरातील १५ वर्ष जुन्या झाडावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गणेशाच्या मूर्तीचीच वाघ कुटुंबीय पूजा करतात.3 / 8शर्वरीने मोरगावातील गणेश चतुर्थीचे फोटो शेअर केले आहेत. यात जुना वाडा पाहायला मिळत आहे. तिने सुंदर बाप्पाचंही दर्शन घडवलं आहे.4 / 8यावेळी शर्वरीने तिच्या आई आणि बहिणीसोबत फोटोशूट केलंय. मराठमोळ्या अंदाजात शर्वरी खूपच सुंदर दिसते आहे. 5 / 8शर्वरीने फोटो शेअर करत लिहिले की, बाप्पा मोरया. श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षाच्या या काळात मी नेहमीच आनंदी असते. तुमचे दिवसही प्रेमाने, हास्याने आणि भरपूर मोदकांनी भरलेले जावोत.6 / 8शर्वरी ही दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. मनोहर जोशी यांची लेक नम्रता वाघ यांची ती लेक आहे. 7 / 8शर्वरी वाघच्या मोठ्या बहिणीचं नाव कस्तुरी वाघ आहे. कस्तुरीही तिच्याइतकीच दिसायला सुंदर आहे. 8 / 8शर्वरीला 'मुंज्या' या सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या सिनेमात ती आलिया भटसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे.