PHOTOS : प्राजक्ता माळीने घेतलं पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:43 IST
1 / 8मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आपल्या चाहत्यांसोबत ती अनेक गोष्टी शेअर करत असते. 2 / 8प्राजक्ताने नुकतंच पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. याचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 8दरवर्षी गणेशाचं आगमन होताच प्राजक्ता पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेते. यंदाही ती न चुकता बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली.4 / 8सालाबादाप्रमाणे... पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, असं कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.5 / 8यंदाचे वर्ष हिंदूस्तानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची भाऊसाहेब रंगारी गणेशाची आरती करण्याचं पुण्य पदरात पडलं, असंही तिने लिहिलं.6 / 8प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.7 / 8अलीकडेच प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ ही सीरिज विशेष गाजली होती. यातील प्राजक्ताच्या कामाचं अपार कौतुक झालं.8 / 8प्राजक्ताला डान्स विषयात करिअर करायचं होतं पण ती अगदी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली. त्यामुळे सुरूवातीची अनेक वर्ष तिने अभिनय फार काही गंभीरपणे घेतला नव्हता, असं तिने या मुलाखतीत सांगितलं होतं.