मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे 'इतक्या' कोटींची मालकीण; आकडा पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:20 IST
1 / 10टीव्हीच्या दुनियेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी मृणाल ठाकूर आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच, मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांचा नवीन चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. 'लव्ह अँड वॉर'सारख्या रोमांचक कथेनंतर, हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल.2 / 10मृणाल ठाकूरने तिच्या जबरदस्त अभिनयाने, स्टाईलने आणि वाढत्या फॅन फॉलोईंगने हे सिद्ध केले आहे की ती चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये सामील होण्यासाठी आली आहे. तिचा प्रत्येक लूक आणि परफॉर्मन्स हे दर्शवितो की मृणाल आता बॉलिवूडची नवीन क्वीन बनण्याच्या मार्गावर आहे.3 / 10मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला. तिने तिचे शालेय शिक्षण सेंट जोसेफमधून पूर्ण केले आणि त्यानंतर उच्च शिक्षण वसंत विहार हायस्कूलमधून घेतले.4 / 10मृणालने तिच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात स्टार प्लसच्या 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियां' या शोमधून केली.5 / 10'कुमकुम भाग्य' या मालिकेने मृणालला घराघरात प्रसिद्ध केले आणि ती प्रत्येक चाहत्याची लाडकी बनली.6 / 10बॉलिवूडमध्ये मृणालचा पहिला चित्रपट 'लव्ह सोनिया' होता. पण, तिच्या करिअरला खरी कलाटणी 'सुपर ३०' या चित्रपटाने दिली.7 / 10'सुपर ३०' चित्रपटानंतर मृणालच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला. जिथे तिने हृतिक रोशनसोबत काम करून तिची ओळख अधिक मजबूत केली.8 / 10'सीता रामम' आणि 'हाय नन्ना'सारख्या साउथ चित्रपटांमधील मृणालच्या अभिनयाने हे सिद्ध केले की ती पॅन इंडिया स्टार बनली आहे.9 / 10टाइम्स ऑफ इंडिया मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृणाल ठाकूरची एकूण संपत्ती सुमारे ३३ कोटी रुपये आहे, जी सतत वाढत आहे आणि ती एका प्रोजेक्टसाठी ५ कोटी रुपये मानधन घेते.10 / 10मृणाल ठाकूरचा नवा चित्रपट ‘डकैत’ २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यात दमदार प्रेमकथा पाहायला मिळेल आणि चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.