माधुरी दीक्षितची मुलं काय करतात? दोघांना सिनेमात नाही रस; म्हणाली, "त्यांना ही सर्कस.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:44 IST
1 / 8अभिनेत्री माधुरी दीक्षितविषयी सगळ्यांना माहितच आहे. ८०-९० च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री आजही आपल्या सौंदर्य आणि गोड हास्याने चाहत्यांना प्रेमात पाडते.2 / 8माधुरीने करिअरच्या शिखरावर असताना डॉ नेनेंसोबत लग्न केलं होतं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. तिथेच तिच्या दोन्ही मुलांचाही जन्म झाला. काही वर्षांपूर्वीच माधुरी भारतात परतली. पण तिची मुलं काय करतात माहितीये?3 / 8माधुरीची दोन्ही मुलं अरिन आणि रायन प्रसिद्धीझोतापासून दूरच असतात. दोघंही परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांना फिल्म इंडस्ट्रीविषयी अजिबातच रस नाही. 4 / 8नुकतंच एका मुलाखतीत माधुरी म्हणाली, 'मोठा मुलगा अरिनला फिल्म इंडस्ट्रीत थोडाफार रस होता. पण त्याचं मुख्य पॅशन संगीत आहे. तो स्वत: संगीत कंपोज करतो, प्रोड्युस करतो. शाळेतही त्याने म्युझिक हा मायनर विषय घेतला होता आणि कंप्युटर इंजिनिअरिंग मुख्य विषय म्हणून निवडला होता.'5 / 8'अरिन ग्रॅज्युएट झाला आहे आणि सध्या तो अॅपलमध्ये काम करत आहे. नॉइज कॅन्सिलेशन प्रोग्रॅमवर तो काम करतोय.'6 / 8'छोटा मुलगा रायनला सिनेमांमध्ये अजिबातच रस नाही. तो सायंस अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात आहे. युएसच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तो खूप टॅलेंटेड आहे.'7 / 8माधुरी म्हणाली, 'मी त्यांना फिल्म इंडस्ट्रीपासून दूर ठेवलं नाही. जेव्हा त्यांना माझ्यासोबत यायचं होतं ते आले आणि जेव्हा यायचं नव्हतं तेव्हा मी त्यांना आग्रह केला नाही.'8 / 8सिनेसृष्टीकडे मुलं कोणत्या दृष्टीने बघतात? असं विचारल्यावर माधुरी म्हणाली,'माझी मुलं खूपच वेगळी आहेत. छोटा मुलगा या सगळ्याला सर्कसच म्हणतो. तो यापासून दूरच असतो. आजकाल तर कुठे बाहेर जाणंही सर्कसच आहे. मोठा मुलगा एकदम बिंधास्त, दिलखुलास आहे. दोघंही कधीच इंडस्ट्रीशी जोडले गेले नाहीत.'