By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:59 IST
1 / 9 गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असणाऱ्या वहिदा रहमान यांनी हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बंगाली चित्रपटातून भूमिका साकारत चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे.त्यांच्या या कारकिर्दीत एकदा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार व दोन फिल्मफेअर अॅवार्ड त्यांच्या नावावर आहेत.2 / 9 अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ ला तामिळनाडूतील चेंगलपेट येथील जिल्हा आयुक्त मोहम्मद अब्दुर रेहमान आणि त्यांची पत्नी मुमताज बेगम यांच्या कुटुंबात झाला. विशाखापट्टणम येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.3 / 9 रुपेरी पडद्यावरील त्यांची कारकिर्द १९५५ मध्ये आलेल्या ‘रोजुलु मरायी ’ या तेलगु चित्रपटापासून झाली. या चित्रपटात त्यांनी नृत्य सादर केलं होतं.4 / 9 त्याचवर्षी त्यांनी जयसिम्हा (१९५५) या चित्रपटात एन. टी. रामाराव यांच्याबरोबर मुख्य नायिकेची भूमिका साकारली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीचं नशीब उजळलं.थेट दिग्गज दिग्दर्शक गुरुदत्त यांनी त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली.5 / 9 त्यांनी वहिदा यांना मुंबईला बोलावलं आणि सीआयडी (१९५६) या राज खोसला दिग्दर्शित चित्रपटात नकारात्मक छटा असलेली भूमिकेची ऑफर दिली. असं सांगण्यात येतं,या चित्रपटासाठी गुरुदत्त यांनी वहिदा यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. मात्र गुरूदत्त यांच्या तो सल्ला त्यांनी नाकारला. 6 / 9 आपल्या अभिनय कारकीर्दीत वहिदा रहमान यांनी 'कागज के फूल','12 ओ' क्लॉक','चौदहवीं का चांद','साहिब - बिबी और गुलाम', यांसारखे अनेक चित्रपट सोबत केलेत.साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातील भूमिकेकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या श्रेणीत पहिले फिल्मफेअर नामांकन मिळवून दिले. या चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. 7 / 9 एप्रिल १९७४ मध्ये, सहअभिनेता कमलजीत (शशी रेखी) यांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. चित्रपट कारकिर्दीच्या यशोशिखरावर असताना वहिदा यांनी त्यांच्याशी विवाह केला. 8 / 9या दाम्पत्याला मुलगा सोहेल रेखी व मुलगी काश्वी रेखी ही दोन अपत्ये झाली. यातील काश्वी रेखी या लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.9 / 9 वहिदा यांच्या चित्रपट कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, वेशभूषा अयोग्य वाटल्यास नाकारण्याचा अधिकार मिळावा हा नियम समाविष्ट करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.